ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने आदर्श शिक्षक गुण गौरव पुरस्कार सोहळा थाटात संपन्न


मावळ मराठा न्युज -लोणावळा,ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने आदर्श शिक्षक गुण गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला.प्रमुख पाहुणे डॉ. शाळिग्राम भंडारी, श्रीमती सुरेखा जाधव, श्री नंदकुमार वाळुंज, धीरूभाई कल्यानजी,लोणावळा कॉलेज, प्रा चार्य श्री नरेंद्र देशमुख, श्री विजय राव सोशल वर्कर , सौं आशा राव, घरोंदा डायरेक्टर , आयस्कॉम, लायन भरत पोतदार, घनश्याम केळकर,सचिव, बारामती, भूमिपुत्र फाउंडेशन, परिजा भिलारे, युवा मोर्चा आघाडी, अनिल गायकवाड , अध्यक्ष, भाजप, लोणावळा नाणे मंडल यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरूवात झाली. संघाची प्रार्थना, साने गुरुजींची प्रार्थना मृदुला पाटील, संध्या गव्हले, शारदा आगरवाल यांनी गायली. बिल्वा मोरे हिने नृत्यातून गणेश वंदना सादर केली. आदर्श शिक्षक म्हणून पुढील शिक्षकांचा संघाच्या वतीने गुण गौरव करण्यात आला. वैजयंता म्हाळसकर, सविता शिन्दे, युनिता पत्राव, कुमार चोरघे, भटू देवरे, सतीश माळी, राजघर अहिर राव, यां शिक्षकांचा आदर्श शिक्षक म्हणून गुण गौरव करण्यात आला. ज्येष्ठ नागरिक संघाचे सत्यनारायण आगरवाल यांनी एकाच दिवशी सीक्रेट दिवशी एका दिवसात जास्त एल आय सी पॉलीसी केल्या त्या रेकॉर्ड मध्ये सत्यनारायण आगरवाल हे सहभागी होती त्या मुळे त्यांचे नाव गिनिज बुक मध्ये नोंदले गेले त्यांचा सत्कार झाला, बिल्वा मोरे हिने गणेश वंदना नृत्यातून सादर केली तिचा सत्कार करण्यात आला, ज्योती रांगणे यांनी सन्मान चिन्ह देण्यासाठी आर्थिक मदत केली त्यांचा सत्कार करण्यात आला.ज्येष्ठ नागरिक संघाच्या सर्व पदाधिकारी व सदस्य यांच्या सहकार्याने कार्यक्रम छान पार पडला. अध्यक्ष श्री तिखें सर यांनी प्रास्ताविक सादर केले आणि रश्मी शिरसकर यांनी सूत्र संचालन केले








