तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन हद्दीतील नगरपरिषद तळे येथे पूरजन्य परिस्थिती,आपातकालीन परिस्थिती व आपत्ती व्यवस्थापनाबाबत डेमो कॅम्प


मावळ मराठा न्यूज़ तळेगाव ,(प्रतिनिधि )आज दिनांक १९/०७/२०२३ रोजी दुपारी एक वाजता तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन हद्दीतील तळेगाव स्टेशन येथील नगरपरिषद तळे येथे पूरजन्य परिस्थिती ,आपातकालीन परिस्थिती व आपत्ती व्यवस्थापनाबाबत डेमो कॅम्प घेण्यात आला होता. सदर कॅम्पमध्ये ग्राम सुरक्षा दल सदस्य, वन्यजीवन रक्षक मावळ संस्था व राणीॲम्बुलन्स ,विरा ॲम्बुलन्स बोट इत्यादी साहित्य वापरून सदरचा डेमो घेण्यात आलेला आहे, एखादा व्यक्ती बुडाल्यास त्याला कसे वाचवायचे याचे डेमो द्वारे प्रशिक्षण देण्यात आले तसेच नागरिकांना देखील सदरचा डेमो दाखवण्यात आलेला आहे.त्या प्रसंगी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यवान माने साहेब यांच्यासोबत प्रशांत वाबळे साहेब ,बाबाराजे मुंडे साहेब, कृष्णा साहेब व इतर पोलीस स्टाफ उपस्थित होता. तसेच वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश संपतराव गराडे संस्थेचे आपत्ती व्यावस्थापन सर्च आणी रेस्कु टिम चे अध्यक्ष गणेश निसाळ ,भास्कर माळी,जीगर सोळंकी,सर्जेस पाटिल, विनय सावंत,शुभम काकडे,सार्थक घुले,गणेश गायकवाड,अविनाश कार्ले,गणेश सोंडेकर,विकी दौंडकर,कुनाल दाभाडे ,श्रीयस भेगडे,सुरज शिंदे ,प्रशांत शेडे,गौरव चेपे,गणेश ढोरे या डेमो कॅंप करण्याची तळेगाव दाभाडे पोलीस यांनी संस्थेला जी संधी दिले त्या बद्दल रेस्कु टिम चे अध्यक्ष गणेश निसाळ यांनी सर्व पोलीस अधीकारी व कर्मचारी यांचे आभार मानले




