वारसा स्वच्छतेचा,मावळा शिवरायांचा”अंतर्गत स्वच्छता मोहीम २६ मे ला तिकोना किल्ल्यावर


मावळ मराठा न्यूज ,लोणावळा,२३ पुणे ग्रामीण,जिल्हा पोलिस,लोणावळा उपविभाग आयोजित “वारसा स्वच्छतेचा,मावळा शिवरायांचा” अंतर्गत स्वच्छता मोहीम पुणे ग्रामीण चे पोलीस अधीक्षक अंकित गोयल,पुणे ग्रामीण चे अप्पर पोलीस अधिक्षक मितेश घट्टे यांच्या मार्गदर्शनाने वारसा स्वच्छतेचा,मावळा शिवरायांचा”अंतर्गत स्वच्छता मोहीम मावळात सुरू करण्यात आली आहे. पाचवे पर्व गडकिल्ले प्रेमी यांचे श्रद्देचे पवित्र ठिकाण म्हणजे मावळातील तिकोना किल्ला आणि परिसर या ठिकाणी स्वच्छता अभियान दिनांक २६ मे २९२३,वार शुक्रवार रोजी सकाळी ६ वाजता राबविण्यात येणार आहे. तरी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तिकोना किल्ला येथे गडकिल्ले प्रेमी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन वारसा स्वच्छतेचा,मावळा शिवरायांचा ही संकल्पना ज्यांनी मावळात राबवून लोणावळा उप विभाग हद्दीतील चारही पर्वाला थोड्याच कालावधीत अगदी नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळवला असे लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक आय पी एस सत्य साई कार्तिक यांनी केले आहे.आय पी एस सत्यसाई कार्तिक यांनी आपण समाजाचे काही देणे लागतो त्यामुळे गड किल्ले यांच्या सफाई सोबत गुन्हेगारी आणि समाजातील व्यसन हे सुध्दा आपल्याला नष्ट करायचे आहे त्यामुळे आपल्याला कचरा सोबत हे काम देखील सदृढ समाज निर्मिती साठी करावे लागणार असल्याचे मावळ मराठा न्यूज शी बोलताना सांगितले. यात अभियानात शिवदुर्ग मित्र,लोणावळा शहर पत्रकार संघ ,सिंहगड महाविद्यालय,लोणावळा महाविद्यालय,उदय शेट्टी मित्र परिवार वकील,समस्त ग्रामस्थ आदींनी याआधीच्या पर्वात मोठा सहभाग नोंदवला आहे




