लायन्स क्लब ऑफ़ लोणावळा खंडाळा महावीर गोपाल कृष्ण गौशाळा उद्घाटन सोहळा संपन्न

मावळ मराठा न्युज -अर्डाव,मावळ, २४ नोव्हेंबर २०२५,अर्डाव (मावळ) गावात श्री महावीर गोपाल कृष्ण गौशाळा ट्रस्ट यांच्या नव्या गौशाळेचे भव्य उद्घाटन उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाले. गावातील गौमातांची सेवा व संरक्षण या उदात्त हेतूने सुरू झालेल्या या उपक्रमाची सुरुवात सुनील महाराज वरगड़े यांनी केली होती. विविध ठिकाणांहून वाचवलेल्या व दुर्लक्षित अवस्थेत असलेल्या गायींची त्यांनी मनापासून माया, औषधोपचार व सेवा केली. मात्र वाढत्या गाईंमुळे निवारा, चारापूरवठा आणि आर्थिक साधनसंपत्तीचा अभाव जाणवत होता या सामाजिक कार्याची व्याप्ती वाढविण्यासाठी लायन्स डिस्ट्रिक्ट जीवदया चेअरमन लायन विरल गाला यांना गोशाळेचे कार्यास मदती ची विनंती करण्यात आली त्यानुसार त्यांनी निमीता किशोर सुर्जी शाह (USA) यांच्याशी संपर्क साधला व त्यांच्या उदारतेने गौशाळेला देणगी मिळाली आणि गौशाळेला अधिकृतरित्या “श्री महावीर गोपाल कृष्ण गौशाळा ट्रस्ट, अर्डाव मावळ” असे नाव देण्यात आले.या उद्घाटन प्रसंगी लायन्स क्लब ऑफ लोणावळा खंडाळा यांनी गौशाळेच्या मुख्य प्रवेशद्वार (कमान) चे प्रायोजकत्व स्वीकारत जिवदयेला दीर्घकालीन दिशा दिली. तसेच या जिवदया स्थायी प्रकल्पासाठी क्लबचे सदस्य व दानशूर लोकांचे योगदान मिळाले लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन राजेशजी अग्रवाल तसेच लायन्स लोणावळा खंडाळा अध्यक्ष – लायन कांता ओसवाल, व नमिताशाह व विदर्भरत्न संजय महाराज पाचपोर, सुनील महाराज वरघडे यांचा हस्ते उदघाटन सोहळा पार पडला त्या प्रसंगी श्रद्धा चेरिटेबलें च्या पल्लवी गांधी किशोर सुर्जी शाह इतर मान्यवर उपस्थित होते तसेच अश्विनी कदम,डिस्ट्रिक्ट जीवदया चेअरमन – लायन विरल गाला,अ‍ॅक्टिव्हिटी चेअरमन डॉ. पोपट ओसवाल, डॉ. दिलीप सुराणा, मंगेश कदम, अॅड. प्रफुल लुंकड,अभय जैन, प्रकाश जैन, राजू राजपूत, मनोज लुंकड, जयश्री सुराणा, सीमा पारख, अॅड. दीप्ती लुनावत, दिपाली गाला,रिंपल पटवा ,नील पटवा श्री रमेशचन्द्र पारेख,उमेश अग्रवाल ,नंदकिशोर खंडेलवाल,संजय वरघडे, संजय सुरज वरघडे ,राहुल गराडे व इतर मान्यवर उपस्थित होते त्या वेळेस गोसेवेचे महत्व मान्यवरांनी पटवून दिले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page