*लायन्स क्लब ऑफ लोणावळा लिजेंड्स यांच्या वतीने ऍड. बापूसाहेब भोंडे हायस्कूल येथे विद्यार्थ्यांची डोळ्यांची तपासणी शिबिर संपन्न*

मावळ मराठा न्युज – लोणावळा,लायन्स क्लब ऑफ लोणावळा लिजेंड्स यांच्या वतीने व डॉ. सुहास हळदीपूरकर संचलित लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट आय हॉस्पिटल यांच्या सहयोगाने दिनांक १३ व १४ ऑक्टोबर रोजी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी डोळ्यांची तपासणी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सुमारे ४०० विद्यार्थांची नेत्र तपासणी करण्यात आली. अल्प वयात विद्यार्थ्यांना दृष्टी दोष होण्याचे प्रमाण वाढत आहे व चष्मा लावण्याची गरज निर्माण होत आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी ऍड. बापूसाहेब भोंडे हायस्कूलच्या संचालिका राधिकाताई भोंडे, तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ थत्ते, शाळेचे शिक्षक व कर्मचारी, तसेच तसेच लायन्स क्लब ऑफ लोणावळा लिजंड्सच्या अध्यक्षा वैशाली साखरेकर, सचिव मीनाक्षी गायकवाड खजिनदार नूतन घाणेकर, माजी अध्यक्ष सौ उमा मेहता, सुरेश गायकवाड, राजेश मेहता, विवेक घाणेकर, गोरख चौधरी, विजय रसाळ व अन्य मान्यवर उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page