पुना सिक्युरिटी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या सिक्युरिटी एजन्सीच्या १३३ सुरक्षा रक्षकानी केले रक्तदान



मावळ मराठा न्यूज, तळेगांव:- (ॲड गणेश जगताप)पुना सिक्युरिटी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या सिक्युरिटी एजन्सीने आज २८/०५/२०२३ रोजी दोन वेगवेगळ्या ठिकाणी रक्तदान शिबिर चे आयोजन केले होते एक दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल मार्फत चाकण एरिया मध्ये एका प्रायव्हेट कंपनीत आणि गरवारे रक्तपेढी जनरल हॉस्पिटल तळेगाव या ठिकाणी त्यात १३३ सुरक्षा रक्षक यांनी आपले रक्तदान करून समाजसेवेत आपले योगदान दिले चाकण विभागात श्री एकनाथ रंगारी आणि श्री विनायक शिंदे आणि जनरल हॉस्पिटल गरवारे रक्तपेढी येथे श्री सर्जेस पाटील आणि मच्छिंद्र सूर्यवंशी या कंपनी अधिकाऱ्यांच्या देखरेखी खाली रक्तदान शिबिर संपन्न झाले. पूना सिक्युरिटी ही एजन्सी औद्योगिक क्षेत्रात सुरक्षा पूर्वत असताना असे वेगवेगळे सामाजिक कार्यक्रम घेताना अनेक वेळा आपल्याला निदर्शनात आले आहे जसे की वृक्षारोपण रक्तदान शिबिर असे अनेक कार्यक्रम ही पुना सिक्युरिटी समाजात राबवत आहे. या सुरक्षा रक्षकांना त्यांच्या या सामजिक कार्याला मावळ मराठा न्यूज परिवाराच्या वतीने सलाम




