वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या लोणावळा शहरातील राडारोडा,डांबरीकरण,जंगली झाडे तोड खड्डे बुजवावित -जितेंद्र कल्याणजी



मावळ मराठा न्यूज,लोणावळा :- शहरात इंद्रायणी नदी ड्रेनेज चे कामासाठी अनेक ठिकाणी राडारोडा खड्डे घाण जंगली झाडे साफ सफाई ची कामे पाऊस सुरू होण्याआधी लोणावळा नगरपरिषदेने करून घ्यावी अशी नागरिकांची मागणी आहे तरी पालिका प्रशासनाने सदर कामे त्वरित करून घ्यावीत जेणे करून शहरात पुर परिस्थिती निर्माण होणार नाही. पावसाळा सुरू होण्यापूर्वी लोणावळा नगरपरिषदेने कुमार रिसॉर्ट चौक ते मावळा पुतळा रस्त्यावरील मॅक डोनाल्ड मॉल समोरील रेल्वे ब्रीज शेजारील खड्डा बुजवून घ्यावा,व रस्ता रुंदीकरण करावे जेणेकरून वाहतूक कोंडीची समस्या थोड्या प्रमाणात कमी होण्यास मदत होईल,तसेच याठिकाणी असलेली जंगली झाडे झुडपे पालिकेच्या माध्यमातून त्वरित काढून घ्यावी म्हणजे त्याठिकाणी पाणी साचणार नाही अशी मागणी शिक्षण मंडळ माजी सभापती जितेंद्र धीरूभाई टेलर यांनी लेखी निवेदनाद्वारे लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंडित पाटील यांचे कडे केली आहे. निवेदनात टेलर यांनी लोणावळा नगरपरिषदेला संपूर्ण महाराष्ट्रात माझी वसुंधरा अभियानात दुसरा क्रमांक मिळाल्याबद्दल अभिनंदन देखील केले आहे.




