इंद्रायणी नदीत सोडण्यात येणाऱ्या मलमूत्रामुळे शेतकरी,ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात,एकवीरा कृति समिती चा लोणावला नगरपरिषदेला इशारा


मावळ मराठा न्यूज़ :- लोणावला एकवीरा कृति समिति मावळ यांच्या वतीने उगम स्थान असलेल्या इंद्रायणी नदीत लोणावला नगरपरिषदे कडून दूषित आणि मलमूत्र सोडले जाते त्यामुळे पुढील ३० ते ३५ गावांच्या शेतकरी यांची शेती बाधित होत आहे ,इंद्रायणी लगतच्या शेती करणाऱ्या गावातील शेतकऱ्यांचे पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे .त्याच प्रमाणे सदर दूषित पाणी जनवरांसाठी पिण्यासाठी वापरता येत नाही त्यामुळे त्यांच्या आरोग्यवर आणि पिकांवर विपरीत परिणाम होत आहे ,शेतकरी यांना देखील याचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे शेतमजुरांचे देखील मच्छी व्यवसाय दुग्ध व्यवसाय धोक्यात आला आहे .लोणावला नगरपरिषदेने मलमूत्रावर आणि सांडपानी यावर प्रक्रिया करुन पानी सोडावे ,अन्यथा तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशारा एकवीरा कृति समिति मावळ यांच्या कडून लोणावला नगरपरिषदेला दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे यावेळी कृति समितीचे अध्यक्ष बाळासाहेब भानुसघरे ,माजी जिल्हा परिषद् सदस्य आणि कामगार नेते भरतभाई मोरे माजी पंचायत समिति सदस्य दीपक हुलावले,कार्ला ग्रामपंचायत चे उपसरपंच किरण हुलावले, माजी सरपंच नंदकुमार पदमुळे,माजी सरपंच गुलाब तिकोने ,माजी नगरसेवक निखिल कवीश्वर उपस्थित होते .




