सोशल हेंड्स फाऊंडेशन व फॅमिली वेलफेअर रिसर्च अँड ट्रेनिंग सोसायटीचे संयुक्त विद्यमाने विद्यार्थी पालकांसाठी चर्चासत्र व कार्यशाळा संपन्न,

सोशल हेंड्स फाऊंडेशन व फॅमिली वेलफेअर रिसर्च अँड ट्रेनिंग सोसायटीचे संयुक्त विद्यमाने विद्यार्थी पालकांसाठी चर्चासत्र व कार्यशाळा संपन्न,मावळ मराठा न्यूज ,वार्ताहर: निगडी(संतोष शिंदे). सोशल हेंड्स फाऊंडेशन व फॅमिली वेलफेअर रिसर्च अँड ट्रेनिंग सोसायटी चे संयुक्त विद्यमाने ४ जुन रोजी ओझर्डेज रेडिकल इंस्टीट्युट, निगडी,पुणे येथे पालक व विद्यार्थ्यासाठी कार्यशाळा – चर्चासत्र आयोजित करण्यात आले. त्यावेळी प्रमुख अतिथी ऍड. संतोष शिंदे, संस्थापक – सचिव – फॅमिली वेलफेर रिसर्च अँड ट्रेनिंग सोसायटी तसेच मार्गदर्शक श्री. भूषण ओझर्डे, संचालक – ओझर्डे रेडिकल इंस्टीट्यूट यांनी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले. यावेळी फॅमिली वेलफेअर रिसर्च अँड ट्रेनिंग सोसा. चे संस्थापक – सचिव ऍड. संतोष शिंदे यांनी सध्याच्या शिक्षणाच्या चाललेल्या बाजारीकरणा बाबत तसेच विद्यार्थ्यांनी मोबाईल चा वापर त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी करावा. तसेच कौशल्य विकासावर आधारित शिक्षण आणि शिक्षणाच्या अन्य नवनवीन असणाऱ्या संधी बाबत माहिती देवून युवा वर्गाने मोबाईलचा अतिवापर टाळून मोबाईल वापराच्या व्यसनापासून वाचण्याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच यावेळी प्रमुख मार्गदर्शक ओझर्डेज रेडीकल इंस्टीट्यूट चे संचालक प्रोफेसर भूषण ओझर्डे यांनी देखील विद्यार्थी व पालकांना प्ले ग्रुप च्या प्रवेशापासून ते उच्च शिक्षण घेताना येणाऱ्या अडचणी बाबत तसेच वेळोवेळी पालकांकडून जादा फी रुपी उकळण्यात येणाऱ्या रक्कमाबाबत आणि विद्यार्थी व पालकांनी कोणती खबरदारी घ्यावी याबाबत विस्तृत मार्गदर्शन केले. यावेळी श्री. मदन दळे यांनी प्रस्तावना केली व सूत्रसंचालन आणि आभार समाजसेवी श्री. सचिन अडागळे यांनी केले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page