बाळा भेगडे यांनी कुणेनामा जावून वरे कुटुंबीयांची घेतली भेट

मावळ मराठा न्यूज़ लोणावळा दिनांक १३/०६/२०२३ रोजी लोणावळा मुंबई-पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर कुणे नामा उड्डाणपुलाजवळ केमिकल टॅंकरचा अपघात घडला त्यात दुर्देवाने येथील निष्पाप नागरिकांचा बळी गेला यावेळी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मा.मंत्री बाळा भेगडे यांनी भेट घेऊन वरे -पोशिरे कुटुंबियांना लवकरात लवकर आर्थिक मदत मिळावी म्हणून मागणी केली असून,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री सहायता निधी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ मदत पोहचविण्याच्या सूचना दिल्या आहेत त्यासंदर्भांत आज प्रत्यक्ष राजमाची (कुणे)नामा याठिकाणी जाऊन वरे-पोशिरे कुटुंबीयांची सांत्वनपर भेट बाला भेगडे यांनी घेवून त्यांची आस्थेने विचारपूस केली आणि लवकरात लवकर शासकीय मदत देण्याचे आश्वासित केले .

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page