नवीन शैक्षणिक शाळा पूर्वतयारी बाबत, लोणावळा केंद्राची शिक्षण परिषद शाळा क्रमांक एक मध्ये संपन्न



मावळ मराठा न्युज :-लोणावळा नगरपालिका शाळेतील सर्व शिक्षक या शिक्षण परिषदेत उपस्थित होते.जालिंदर जाधव सर,टाक मॅडम यांनी हीं परिषद घेतली. या शैक्षणिक परिषदेत परिसरातील पटनोदिनी, शाळेतील भौतिक सुविधा शिष्यवृत्ती परीक्षा, मंथन परीक्षा, समाज भिमुख शिक्षण पद्धती, शाळेतील केलेल्या कार्याची जाहिराती, गुणवत्ता वारी नुसार केलेल्या उपक्रमाची माहिती, तसेच शैक्षणिक ७१ मुद्द्यावरती चर्चा करण्यात आली. या कार्यशाळेचे दिनांक २६ /४ / २०२४ प्रशासन अधिकारी लोणावळा नगरपरिषद यांच्या सूचनेनुसार नियोजन, शाळा क्रमांक ६ च्या मुख्याध्यापिका नंदा तांदळे यांनी केले होते. शाळा क्रमांक एक च्या मुख्याध्यापिका जोशी मॅडम, तसेच दोनच्या मुख्याध्यापिका प्रतिभा दरेकर मॅडम यांच्या सहकार्याने आजची शिक्षण परिषद संपन्न झाली




