डॉ. बी . एन . पुरंदरे बहुविध विद्यालय प्राथमिक विभाग, लोणावळा-दिंडी सोहळा

मावळ मराठा न्यूज़,मुख्याध्यापक – लोनावला, काल गुरुवार दि. २२ जून रोजी आषाढी वारीच्या पार्श्वभुमीवर इ १ ली ते ४ थी च्या विद्यार्थ्यांच्या दिंडीचा कार्यक्रम आयोजित केला होता . विठूनामाच्या गजरात आणि वारकऱ्यांच्या वेशात विद्यार्थी संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांची पालखी घेवून हुडको येथिल मंदिरात गेले . याठिकाणी हुडको वासियांनी पालखीचे स्वागत केले . माजी नगरसेवक प्रकाश काळे यांनी मुलांना खाऊ वाटप केला . हुडको कॉलनीतील नागरिकांनी पालखि सोहळ्याचा आनंद लुटला मुलांबरोबर हरिनामाचा गजर करीत फुगड्या खेळल्या . चिमुकल्यांची भक्तीमय व आनंदी वातावरणात दिंडी पार पाडली . श्री आनंद गावडे शिक्षिका – सौ. रसिका जगदाळे, सौ. जयश्री वाघमारे, सौ नेहा सोनवणे

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page