तळेगांव दाभाडे नगरपरिषद हद्दीतील नागरीकांनी बापु भेगडे यांचे नगरपालिकेच्या जाचक करवाढी संदर्भात घेतलेल्या स्पष्ट भूमिकेबद्दल मानले आभार

मावळ मराठा न्युज :-तळेगांव दाभाडे शहरातील सर्व सोसायट्यानमधे बोलावून केला सत्कार,तळेगांव दाभाडे शहरातील सर्वसामान्य जनतेला मिळवून दिला न्याय. बापु भेगडे व सहकारी नगरसेवक यांनी या संदर्भात आवाज उठविला होता. तळेगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी एन के. पाटील यांनी आमच्या मागण्या मान्य करत फेर सर्वेक्षण व दुरुस्ती करण्याचे दिले ठेकेदाराला आदेश. नगरसेवक गणेश खांडगे, किशोर भेगडे, गणेश काकडे, अरुण भेगडे, संतोष भेगडे, अरुण माने, सुरेशभाऊ चौधरी, मंगलताई भेगडे, वैशाली दाभाडे, शैलजा काळोखे, विना करंडे व युवक पदाधिकारी, महिला भगिनी यांनी नगरपालिकेच्या जाचक कर वाढी संदर्भात तळेगाव दाभाडे शहरातील सामान्य नागरिकांची भूमिका पत्रकारांच्या समोर अभ्यास पूर्ण रीतीने मांडली. हा प्रश्न सोडवण्याची हमी आता प्रशासनाने घेतली आहे. त्यामुळे सर्वत्र आण्णाचं केलं जातंय अभिनंदन व सत्कार आणि सन्मान.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page