जयवंत फार्मसी कॉलेजमध्ये सांस्कृतिक महोत्सव संपन्न


मावळ मराठा न्यूज,पिंपरी (प्रतिनिधी) ताथवडे येथील जयवंत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक महोत्सव उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे उदघाटन पत्रकार शिवाजी घोडे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी प्राचार्या देविका टिळेकर,प्रा.प्रशांत हंबर आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी ” मी खानदानी पोरगी हाय” अल्बममधील मुख्य कलाकार धनश्री घोडे,निर्मात्या रेखा घोडे,संतोष वाघमारे,दिपाली धस, स्नेहा घोडे यांचा यावेळी कॉलेजच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.यावेळी प्रा. हंबर यांचा केक कापून वाढदिवस साजरा केला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समन्वयक शुभांगी स्वामी सुयश साखरे,प्रणव कुटे,कल्याण पवार,आदित्य खेमसे,यश कदम,समीर सय्यद,विशाल ढवळेयांनी विशेष परिश्रम घेतले.सुत्रसंचालन चेतन चौधरीनर्मदा सोळंकी,वैशाली लिंगे यांनी तर आभार वर्षा वाकचौरे यांनी मानले.




