वर्षाविहार वाहतूक नियमनासाठी लोणावळा पोलीस स्वयंसेवक दला ची स्थापना – सत्यसाई कार्तिक


मावळ मराठा न्यूज़ :- लोणावला, सध्या लोणावळा व मावळ परिसरात पाऊस चालू झाल्यामुळे लोणावळा व परिसरामध्ये शनिवार, रविवार व सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची व वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी होतं आहे, वर्षाविहारासाठी लोणावळा शहर व परिसरात पोलिसांचा बंदोबस्त नेमण्यात येतो, परंतु पोलिसांच्या अपुऱ्या मनुष्यबळामुळे वाहतूक नियमन करण्यासाठी अडचणी येतं आहेत, त्यामुळे लोणावळा उपविभागाचे सहा.पोलीस अधीक्षक श्री सत्यसाई कार्तिक यांनी वर्षाविहार बंदोबस्ता साठी सजग नागरिकांची मदत घेण्याचे ठरवून लोणावळा पोलीस स्वयंसेवक दलाची स्थापना करण्यात आलेली आहे. लोणावळा पोलीस स्वयंसेवक दला मध्ये NCC कॅडेड, NSS कॅडेड, महाविद्यालीन विध्यार्थी, ग्राम सुरक्षा दलाचे जवान, सेवाभावी संस्था चे सदस्य, खाजगी सुरक्षा दलाचे जवान, व स्वेच्छेने काम करू इच्छिणारे नागरिक यांना सहभाग दिला जाणार असून, या दलात सहभागी होण्यासाठी गूगल फॉर्म मध्ये स्वयंसेवकांचे फॉर्म भरून घेण्यात येणार आहेत. तरी आपल्या लोणावळ्यातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी व पर्यटकांना मदतीसाठी लोणावळा पोलीस स्वयंसेवक दला मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन लोणावळा उपविभागाचे सहा पोलीस अधीक्षक श्री सत्यसाई कार्तिक यांनी केले आह




