“योगिक सायन्स “या कैवल्य धाम योग संस्था, लोणावळा शतक महोत्सवी लघु माहिती पटाचे विधान सभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे हस्ते प्रकाशन


मावळ मराठा न्यूज़ :- मुंबई :- कैवल्य धाम योग संस्था यांच्या नरीमन पॉइंट ,मुंबई येथील सेन्ट्रल आर्ट परफोरीमिंग हॉल येथे योगिक सायन्स या शतक महोत्सवी लघु माहिती पटाचे प्रकाशन विधान सभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभु यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.यावेळी कैवल्य धाम चे कार्यकारी अधिकारी ,सचिव सुबोध तिवारी यांनी प्रमुख पाहुणे यांचे शाल श्रीफळ,सन्मान चिन्ह देवून गौरव केला .या लघु माहिती पटात संस्थेची १९२४ ते २०२४ पर्यंतचा वाटचाल व् इतिहास दाखवण्यात आला .हा लघु माहिती पट पवन चौधरी आणि अदित मोहिते यांनी ४ वर्षाच्या आपल्या कैवल्य धाम योग संस्था ,लोणावला येथे प्रत्यक्ष राहू न आपल्या कठोर परिश्रमातून तयार केला . यावेळी उद्योजक नानिक रुपानी ,नितिन ठक्कर ,राकेश सक्सेरिया, डॉ.राजन वेलुकर ,दिनेश पंजवानी ,वंदन शाह अदि मान्यवर उपस्थित होते .प्रस्ताविकात शंभर वर्षांची वाटचाल संस्थेचे सचिव सुबोध तिवारी यांनी विशद केलि तर विधान सभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कैवल्य धाम योग संस्थे च्या १०० वर्ष्याच्या कार्याची प्रशंसा करून पुढील वाटचालिस शुभेच्या दिल्या .सुरेश प्रभु यांनी संस्थेच्या अभिमानास्पद शंभर वर्षाची वाटलचालीचा आढावा घेतला.उपस्थित प्रमुख पाहुने यांचे सुबोध तिवारी यांनी आभार मानले .सदर कार्यक्रमाचे सुन्दर सूत्रसंचसलन अन्विता दीक्षित यानि केले.




