लोणावळ्यात गेली पाच दशके सुरू असलेल्या भव्य दुर्गा पूजा सोहळ्यात उत्सव समितीचे ज्येष्ठ सल्लागार अमितकुमार बॅनर्जी यांचे आवाहन

मावळ मराठा न्युज- लोणावळा, लोणावळ्यातील लोणावळा खोपोली व आय एन एस शिवाजी येथील भक्तजणांनी नवरात्रीत होणाऱ्या वार्षिक दुर्गा पूजा सोहळ्याची घोषणा केली आहे मावळ तालुक्यातील हा सर्वात जुना दुर्गा पूजा सोहळा असून यामध्ये रेल्वे इन्स्टिट्यूट येथे नवरात्रीत स्थानिक ४४ बंगाली कुटुंबे व स्थानिक व्यापारी भाविक यांच्या सहभागामुळे हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो गेली ५४ वर्षे सातत्याने होणारी ही दुर्गापूजा महिषासुर मर्दिनि स्वरूपात असते या दुर्गा पूजा उत्सवात बंगाली समाजातील नागरिकांचा जास्त सहभाग असतो या ठिकाणी गेली ५४ वर्षे सार्वजनिक रीत्या महिषासुर मर्दिनि ची मूर्ती त्याच बरोबर इतर देव देवतांची मूर्ती स्थापना करून विधिवत होम हवन पूजा प्राथना तसेच महाप्रसाद व अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.ही परंपरा व धार्मिक कार्यक्रम तसेच सांस्कृतिक कार्यक्रम अखंडित सुरू राहावे यासाठी इतर समाजातील लोकांनी तसेच विशेषतः व्यापारी वर्गाने या उत्सवात सहभाग घेवून आपले योगदान द्यावे असे आवाहन या उत्सवाचे सल्लागार व संपर्क संस्थेचे संस्थापक अमितकुमार बॅनर्जी यांनी केल आहे लोणावळा व परिसरात अनेक हिंदू बंगाली वर्षानुवर्षे येथे स्थायिक असून या निमित्ताने बंगाली व अनेक स्थानिक नागरिक ही या ठिकाणी दर्शनास येतात व कार्यक्रमात सहभाग घेतात. येणाऱ्या नवरात्रीत ८ ऑक्टोबर ते १२ ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या दुर्गा पूजा उत्सव व सांस्कृतिक कार्यक्रमात सर्वांनी सहभागी होऊन योगदान करावे असे आवाहन सर्व नागरिकाना करण्यता येत आहेदुर्गपुजा समितीचे प्रमुख सदस्य उत्तम रे सुफल चक्रवर्ती,दिनेश बॅनर्जी मिलन गोस्वामी , सुबिर चक्रवर्ती साई बॅनर्जी अनुप शेठ आशिष घोष मीता घोष बुलु चक्रवर्ती हेमंत टाट उदय मुखर्जी साहेब मन्दोल,अपर्ण साबी अभिषेक तसेच ज्येष्ट सल्लागार अमित कुमार बॅनर्जी आदिजन उत्सव समितीच्या बैठकीला उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page