कार्ला ग्रामपंचायत येथे नेञ तपासणी शिबीराचा शेकडो ग्रामस्थानी घेतला लाभ



मावळ मराठा न्यूज़, कार्ला :- कार्ला ग्रामपंचायत येथे नेञ तपासणी शिबीर डॉ. लीना कवितके यांच्या मार्गदर्शना खाली पार पडले या शिबाराचे आयोजन रविंद्र यशवंत गायकवाड व अंकुश वसंत गायकवाड व सिध्दार्थ चौरे यांच्या सहकारातून करण्यात आले. तसेच ग्रामपंचायत कार्ला यांच्या सौजंन्याने पार पडले सकाळी ११ वाजता कार्ला ग्रापंचायतीच्या सरपंच सौ दिपाली हुलावळे व महीला सदस्या सौ उज्वला गायकवाड सौ भारती मोरे सौ सोनाली मोरे यांच्या हस्ते व पंचायत समिती माजी सदस्य दिपकशेट हुलावळे, उपसरपंच किरणशेट हुलावळे, ग्रा पं सदस्य सागर जाधव, ग्रा पं सदस्य सचिन हुलावळे, संतोष मोरे, दत्ताञय हुलावळे, बाळू हुलावळे, प्रशांत हुलावळे, तसेच कार्ला ग्रामस्थ यांच्या उपस्थीत झाले या वेळी एकून १०७ जणांची नेञ तपासनी करण्यात आली. त्यातून ४५ जणांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले व ७ जणांना कामशेत हॉस्पिटल या ठिकाणी मोफत मोतीबींदु आॕपरेशन साठी पाठवण्यात आले आहे .या प्रसंगी डॉ. लीना यांचे स्वागत कार्ला ग्रापंचायतीच्या सरपंच दिपाली हुलावळे यांनी केले तर त्यांच्या सहका-यांचे स्वागत ग्रा पं सदस्या उज्वला गायकवाड भारती मोरे सोनाली मोरे यांनी केले .




