लोणावळ्यातील जगप्रसिद्ध केवल्यधाम योग संस्थेत आज पासून दोन नविन कोर्सेस चे आय पी एस डॉ.भूषण उपाध्याय यांचे हस्ते उद्घाटन



मावळ मराठा न्यूज़ ,लोणावला :- लोणावळ्याची जगप्रसिद्ध योग संस्था कैवल्यधाम येथील गोवर्धन दास सक्सेरिया योग आणि सांस्कृतिक संश्लेषण महाविद्यालयात पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन एज्युकेशन २०२३- २४ कोर्स तसेच डिप्लोमा इन योगा थेरेपी २३ -२४ या दोन्ही कोर्सेस चे उद्घाटन आज आय पि एस डॉ.भूषण कुमार उपाध्याय यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.यावेळी व्यासपीठावर संस्थेचे सचिव सुबोध तिवारी ,योग महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.बंदिता सतपते,प्राध्यापक आरके बोधे,डॉ शरदचंद्र भालेकर उपस्थित होते ,प्रमुख पाहुने यांचे स्वागत बैंड पथकाने केले .सचिव तिवारी यांनी पाहुने यांचे स्वागत आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.तनाव मुक्त जीवन साठी योग साधने शिवाय पर्याय नाही असे उपाध्याय यांनी सांगितले या दोन्ही कोर्सेस साठी देशातील विविध राज्यातून ६२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.रजनीश शर्मा यांनी केले तर आभार डॉ शरद भालेकर यानी मानले .




