रोटरी क्लब निगडीच्या अध्यक्षपदी हरबिंदर सिंग तर सचिवपदी शशांक फडके

मावळ मराठा न्यूज़ ,पिंपरी(प्रतिनिधी) रोटरी क्लब ऑफ निगडी अध्यक्ष पदी हरबिंदर सिंग तर सचिव म्हणून शशांक फडके यांची निवड करण्यात आली. क्लबच्या सर्व संचालक मंडळाचा पदग्रहण सोहळा रावेत येथे संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून क्लबच्या प्रांतपाल मंजू फडके, माजी प्रांतपाल पंकज शहा उपस्थित होते.रोटरी क्लब ऑफ निगडीचे गाणे आणि फोर वे टेस्टचे प्रकाशन करण्यात आले.हरबिंदर सिंग यांनी समाजाप्रती प्रामाणिकपणे आणि जबाबदारीच्या भावनेने सामाजिक कार्य करण्याची आणि जगात आशा निर्माण करण्याची आपण वचनबद्ध असल्याचे सांगितले.सर्व संचालकांनी देखील संघात सामाजिक कार्य करण्याची शपथ घेतली.हरबिंदर सिंग (अध्यक्ष), प्रणिता आलुरकर (माजी अध्यक्षा), सुहास ढमाले(नियोजित अध्यक्ष), केशव मानगे(उपाध्यक्ष), शशांक फडके(सचिव), रवींद्र कदम(प्रशासकीय संचालक , गणेश भालेराव(सेवा संचालक), अमोल मेहता(वैद्यकीय संचालक), सुनील जोशी(खजिनदार), अश्विन कुलकर्णी(प्रसिद्धी प्रमुख), रमेश राव(आयटी), विजय काळभोर(रनाथॉन संचालक), रवी राजापूरकर(सीएसआर), सुभाष जयसिंघानी(मेंबर्स), उषा रंगराजन(फौंडेशन), शुभांगी कोठारी(ग्लोबल ग्रॅण्ट), गुरदीप सिंग(विशेष प्रकल्प),जयंत येवले(युवा),अनिल कुलकर्णी(निरीक्षक),प्रमोद देशमुख(ट्रेनिंग), जगमोहन सिंग(शांतता),हिरा पंजाबी सर्व कार्यकारी सदस्य

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page