लोणावळ्यात जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने महिला दिनानिमित्त “ती”चा सन्मान








मावळ मराठा न्यूज – लोणावळा,लोणावळ्यात जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने महिला दिनानिमित्त “ती”चा सन्मान कार्यक्रम नुकताच हॉटेल चंद्रलोक येथे संपन्न झाला.यावेळी प्रमुख पाहुणे सौ माधुरी कुलकर्णी , पुणे, श्री नंदकुमार वाळंज ( बाबुजी) सिंधु कवीश्वर, ज्येष्ठ नागरिक संघाच्या ज्येष्ठ सदस्या लक्ष्मी देशपांडे, सुशीला गावडे, पार्वती रावळ व्यासपीठावर उपस्थित होत्या.क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या व सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. संघाची प्रार्थना व साने गुरुजींची प्रार्थना माधवी कुलकर्णी यांनी गायली. कै बाबुलाल अगरवाल, माजी अध्यक्ष, ज्येष्ठ नागरिक संघ व कै अरविंद कुलकर्णी, सदस्य यांचे नुकतेच निधन झाले, त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. प्रमुख वक्त्या माधुरी कुलकर्णी यांचा शाल, बुके, सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.माधुरी कुलकर्णी यांनी सर्व ज्येष्ठ नागरिकानी आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबद्दल मार्गदर्शन केले. ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने आदर्श माता पुरस्काराने संगीता नाईक,विठाबाई येवले, सुचित्रा चांदोरकर,रतन कदम,माधवी दळवी यांना सन्मानित करण्यात आले. विशेष पुरस्कार ज्योती रांगणे यांना देण्यात आला. तर सामाजिक कार्यकर्त्या महिला संगीता भुरट, कांचन लुणावत, लायन्स क्लब ऑफ लोणावळाच्या अध्यक्षा वैशाली साखरेकर, , यांना सन्मानित करण्यात आले. सत्कारार्थी नी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच या कार्यक्रमासाठी साप्ताहिक मावळ नागरिक संपादक ॲड संजय पाटील ,संतोषी तोंडे, श्रावणी कामत, ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते, गुलाब पुष्प देऊन सर्वांचा सत्कार करण्यात आला.अध्यक्ष पांडुरंग तिखे,उपाध्यक्ष मृदुला पाटील, संध्या गव्हले,गोरख चौधरी, रविंद्र कुलकर्णी, आत्माराम लोखंडे, सत्यनारायण अगरवाल, शारदा अगरवाल, पांडुरंग बोराडे यांनी सहकार्य केले. तर रश्मी शिरस्कर यांनी सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.कार्यक्रमानंतर अल्पोपहार चा सर्वांनी आस्वाद घेतला.



