सॉफ्टेक सोल्युशन्स अँड सर्व्हिसेस,पुणे यांची लोणावळ्यात १३ व १४ फेब्रुवारीला “ग्रंथालय सेवांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता यावर दोन दिवशीय कार्यशाळा संपन्न








मावळ मराठा न्युज – लोणावळा,सॉफ्टेक सोल्युशन्स अँड सर्व्हिसेस, पुणे यांनी १३ व १४ फेब्रुवारी २०२६ रोजी “ग्रंथालय सेवांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI in Library Services)” या विषयावर महाराष्ट्रभरातील ग्रंथालय व्यावसायिकांसाठी लोणावळा येथील रिव्हिनिर रिसोर्ट येथे दोन दिवसीय राष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळा यशस्वीरीत्या आयोजित केली.या कार्यशाळेप्रसंगी खालील मान्यवरांचा प्रमुख पाहुणे म्हणून सन्मान करण्यात आला—• डॉ. भाऊसाहेब पनागे — एमेरिटस प्राध्यापक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे• डॉ. किशोर इंगळे — प्रमुख, IRC, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, पुणे• डॉ. विष्णू पवार — सिनेट सदस्य, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड पुरस्कार वितरण समारंभात १६ ग्रंथालय व्यावसायिकांचा गौरव करण्यात आला.५० पेक्षा अधिक सहभागी पुणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, लातूर, सोलापूर, ठाणे, नांदेड आदी जिल्ह्यांतून उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.कार्यशाळेत समाविष्ट विषय:AI चे मूलतत्त्वे | LLMs | नैतिक AI | विविध AI साधने | सर्वोत्तम पद्धती | ग्रंथालयातील विद्यार्थी सहभाग वाढविणेसंसाधन व्यक्ती:श्री. चेतन टाकसाळे, श्री. इद्रिश खान, श्री. प्रल्हाद जाधव, श्री. प्रदीप बच्चाव व डॉ. महेंद्र गुप्तातसेच ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतलेल्या आयोजन समितीचे मनःपूर्वक आभार—यात चेतन टाकसाळे, इद्रिश खान, डॉ. राहुल देशमुख, डॉ. राहुल विश्वे, डॉ. महेंद्र गुप्ता, रोहिणी टाकसाळे व दिलीप देशमुख,यांच्या समावेश होता. तसेच या उपक्रमात योगदान देणाऱ्या सर्व टीम सदस्यांचे मनापासून आभार.



