ओम्मन चांडी यांचे विरोधकांसोबत देखील सलोख्याचे संबंध होते- आमदार जोसेफ


मावळ मराठा न्यूज़ , पिंपरी(प्रतिनिधी) केरळच्या राजकारणात ओम्मन चांडी सारखे राजकारणी पुन्हा होणार नाही. अशा अजातशत्रू,हरहुन्नरी,समाजासाठी झोकून देणाऱ्या विकास पुरुषाला आम्ही मुकलो आहोत. केरळच्या राजकारणात त्यांची उणीव कायम भासणार.त्यांच्यावर टीका झाली तरी त्यांनी विरोधकांसोबत द्वेष न करता सलोख्याचे, मैत्रीपूर्ण संबंध जपले. असे उदगार केरळचे आमदार सजीव जोसेफ यांनी आकुर्डी येथे काढले.केरळचे माजी मुख्यमंत्री ओम्मन चांडी यांचे नुकतेच निधन झाले. शहरातील विविध मल्याळी संघटना एकत्रित येवून सर्व पक्षीय श्रध्दांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.यावेळी कामगार नेते राजन नायर, आयोजक, शहर कॉंग्रेसचे सरचिटणीस सजी व्हर्की, फा. डेन मॅथ्यू दास, चिंचवड मल्याळी समाजम चे अध्यक्ष टी.पी विजयन, माजी नगरसेवक बाबू नायर, उद्योजक गणेश कुमार, सीएमएस चे माजी अध्यक्ष पी.व्ही भास्करन, पत्रकार रवी एनपी, पुणे कॉंग्रेसच्या सचिव शानी नौशाद,टी.डी जॉन आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी टी.पी विजयन होते.आमदार जोसेफ पुढे म्हणाले कि, चांडी हे इतके प्रसिद्ध होते कि, त्यांचे दर्शन घेण्यासाठी आजही त्यांच्या थडग्यातजवळ नागरिक गार्डन्स करीत आहे.ते शेवटपर्यंत गोरगरिबांसाठी खूप झटत राहिले. कन्नूरचे विमानतळ, बंदरे उभारणी करण्यात त्यांचा सिन्हाचा वाटा होता.कार्यक्रमाचे प्रास्ताविक रवी एनपी, लता विनोद यांनी सूत्रसंचालन केले तर आभार सजी व्हर्की यांनी मानले.




