डॉक्टर संगीता ठाकूर वानखेडे यांचा सेवा पूर्ती सोहळा संपन्न

मावळ मराठा न्युज -खोपोली -नुकताच खोपोली येथे रोटरी क्लबच्या सभागृहात खोपोली नगरपरिषदेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.संगीता ठाकूर वानखेडे यांनी ३२ वर्षांहून अधिक वैद्यकीय सेवा करून सेवानिवृत्त झाल्याबद्दल डॉ.प्रमोद वानखेडे परिवारातर्फे आयोजित करण्यात आलेल्या भव्य समारंभासाठी मा. जिल्हा शल्य चिकित्सक अलिबाग सिव्हिल हॉस्पिटल येथून मा.डॉ निशिकांत पाटील ,सहायक आयुक्त, नगरपरिषद प्रशासन शाखा,कोकण विभाग चे मा.श्री.अरविंद नातु , १९९४ सालचे, मा.मुख्याधिकारी‌ श्री अजीज कारचे २०१३ सालचे मा.मुख्याधिकारी श्री. धुपे , मा.नगराध्यक्ष खोपोली नगर परिषद,श्री.कुलदिपक शेंडे ,माजी नगराध्यक्ष श्री सोहनराज राठोड,माजी नगराध्यक्ष श्री अरविंद विठ्ठलानी , माजी नगराध्यक्ष श्री दत्ताजीराव मसुरकर ,मा महिला बाल कल्याण समिती सभापती सौ सुवर्णा मोरे या प्रसंगी उपस्थित होते.आपल्या मनोगतात सौ.डॉक्टर संगीता ठाकूर वानखेडे म्हणाल्या की,फेब्रुवारी १९९४ पासून डॉ बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय , खोपोली येथे कार्यरत आहे .त्यावेळी मुख्याधिकारी साहेब कारचे असल्यामुळे निर्धोक पणे कार्य करत होते . १९९५ डिसेंबर ला पहिला पोलियो कार्यक्रम झाला .सोबतचे डॉ कटकदौंड यांचे राजीनामा नंतर जून १९९७ एकटीने दीड वर्ष २४ तास काम केले. १९९८ पासून डॉ वानखेडे यांचे मदतीने हजारो कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्या ,नार्मल डिलिव्हरी चे प्रमाण वाढविले ,सर्व शाळांमध्ये आरोग्य तपासणी पूर्ण केल्या ,शासकीय १ ते १८ इंडिकेटर चे काम १००% पूर्ण केले,नगर पालिकेच्या रुग्णालयात एच आय व्ही तपासणी नियमित पणे सुरू केली.यासाठी चे ट्रेनिंग व इतर सर्व शासकीय ट्रेनिंग आवश्यकते प्रमाणे पूर्ण केले .मा.धुपे याच्या काळात राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम प्लानिंग सुरू केले रूग्णवाहिका मोफत सुविधा सुरू झाली.सर्वात कठीण काळ कोरोना २०२० मार्च नंतर सुरू झाला. पण त्यावेळी हॉस्पिटल चे सर्व स्टाफ , मुख्याधिकारी शेट्ये सर व ऑफिस स्टाफ यांचे मदतीने सर्व काम पूर्ण केले . २०२३ ला वैयक्तिक आयुष्यात खूप मोठे संकट सर्वांच्या कृपाशिर्वादाने पार पडले.२०२४ च्या डिसेंबर व जानेवारीत नगर पालिकेच्या जिल्हा व कोकण विभाग खेळ स्पर्धेत बॅडमिंटन, चेस व टेबलटेनिस वी बक्षिसे मिळाली .

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page