लोणावळ्यात सुकन्या समृध्दी योजनेच्या उद्दिष्टपुर्ती निमित्त् पासबुक मुलींना वितरीत


मावळ मराठा न्यूज:- लोणावळा,नुकताच लोणावळा येथे सुकन्या समृध्दी योजनेच्या उद्दिष्टपुर्ती निमित्त् पासबुक मुलींना वितरीत करण्याचे आयोजन केले होते त्यानिमित्त माजी नगरसेविका बिंद्रा गणात्रा व पश्चिम उपविभाग पुणे ग्रमिणचे सहा.अधिक्षक गणेश वडुरकर यांच्या शभहस्ते तसेच ज्येष्ठ नागरिक संघ लोणावळाचे नामदेवराव डफळ ,पोस्टमन,एम टी एस युनियनचे सचिव महेश टकले लोणावळाचे पोस्टमास्तर भारत गवळी यांच्या उपस्थितीत करण्यात आले यावेळी विविध वक्त्यानी आपली मनोगते व्यक्त केली . तसेच श्री गणेश वडुरकर यांनी सुकन्या समृध्दी योजनेचे महत्त्व व पोस्टाच्या विविध बचत योजनेची महिती सविस्तरपणे दिली व आपली गुंतवणुक पोस्टात करावी असे आवाहन उपस्थित ग्राहक तसेच मुलींच्या पालकांना केले या कार्यक्रमासाठी लोणावळा पोस्ट व लोणावळा परिसरातील पोस्ट कर्मचारी व मुलींचे पालक वर्ग उपस्थित होते कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुनिल गरुड यांनी केले व आभार प्रदर्शन विवेक थोरवे यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लोणावळा पोस्ट कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली




