पिंपरी चिंचवडचे सुपुत्र पै.काळुराम लांडगे व सामाजिक कार्यकर्त्या सौ.कल्पनाताई भाईगडे यांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

मावळ मराठा न्युज – दि.२२.०२.२०२६ वाई येथे लोकमान्य टिळक ग्रंथालय हॉल मध्ये विद्यानिकेतन सामाजिक व शैक्षणिक संस्था , महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच ७ व्या वर्धापना दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात धार्मिक ,क्रिडा ,कला ,शैक्षणिक,पर्यावरण, साहित्यिक,सांस्कृतिक,पत्रकारिता, राजकीय,अशा उल्लेखनिय क्षेत्रात पैलवान काळुराम लांडगे यांच्या जीवनाचा केंद्रबिंदू समाजसेवा ! असा दुर्दम्य आशावाद आणि मानवकेंद्रित दृष्टिकोन लाभलेले,समाजसेवक तसेच समाजामध्ये अढळ पदे निर्माण केली अनेक अडी अडचणींना सामोरे जात असताना गावाकुसा बाहेरील वेदना आणि दुःखांचा अनुभव यांची वाट तुडविताना पचविला.जिद्द चिकाटी तसेच , कठोर परिश्रम या परिस्थितीतही विविध क्षेत्रात काम करीत राहिल्यामुळे व भुतकाळ अंधारमय तरीही वर्तमानात समर्थपणे जगण्याची आणि भविष्यातील विचार करण्याची क्षमता अचाट असल्यामुळे पिंपरी चिंचवड शहराचे शिलेदार कासारवाडीचे सुपुत्र पैलवान काळुराम लांडगे व चिंचवडगांव येथील सामाजिक कार्यकर्त्या कल्पना भाईगडे यांना सर्वोत्कृष्ट समजला जाणारा राज्यस्तरीय” आदर्श कार्य गौरव समाजरत्न पुरस्कार २०२६ “सन्मानिय प्रमुख पाहुणे वाई शहराचे नगराध्यक्ष मा.श्री.अनिल सावंत , नगरसेवक श्री.विजय ढेकाणे , उद्योजक श्री.सतिश बनवट , शिवछत्रपती पुरस्कार विजेते पैलवान संपतराव साळुंखे यांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह , सन्मानपत्र,शाल देऊन पुरस्कार बहाल करण्यात आला.एकुण ३१ जणांना पुरस्कार देण्यात आले.यावेळी उद्योजक श्री.प्रसाद बनकर,नगरसेवक श्री.नितीन वरखडे , श्री.संतोष शिंदे,कुस्तीपट्टु पैलवान सत्यजीत माने उपस्थित होते .तसेच पुरस्कार्थी व त्यांच्या नातेवाईक व नागरिकांनी भरपुर गर्दी केली होती.कार्यक्रम संपुर्ण पारपाडण्यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.शाशिकांत कोचळे सर यांनी भरपुर प्रयत्न केले. आभार श्री.सुनिल जांभळे यांनी मानले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page