डी पी एम एस पी या जालना स्थित पाच लायन्स क्लब आणि तीन लिओ क्लबचा मधुरा बँक्वेट हॉल मध्ये शपथविधी संपन्न


मावळ मराठा न्यूज़ :- दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. आर सी सौ मीनाक्षी दाड यांनी नवीन सभासदांना शपथ दिल्यानंतर माजी प्रांतपाल ला विजयजी बागडिया संस्थापक अध्यक्ष ला सुभाषजी देविदान यांनी आपल्या मनोगतात मार्गदर्शना बरोबर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्यात. झेड सी लायन संतोषकुमार दुधानी आणि इंद्रजीत केदारे यांनीही आपली मनोगते व्यक्त केलीत. माजी प्रांतपाल- अष्टपैलू अनुभव संपन्न व्यक्तिमत्व ला पुरुषोत्तम जयपुरिया यांनी पदग्रहण समारंभाची सुरुवात केलि. नऊ क्लबच्या पदाधिकाऱ्यांना त्यांच्या हक्काची आणि कर्तव्याची जाणीव अतिशय समर्पक शब्दात उदाहरणासह ला पुरुषोत्तम यांनी दिली . लायन सुनील बियाणीनी तळेगावहुन या समारंभाचे समारंभास प्रमुख पाहुणे ज्येष्ठ लेखक वक्ते ला डॉक्टर शालिग्राम भंडारी यांचा परिचय अतिशय समर्पक मोजक्या शब्दात सभागृहास करून दिला.महामृत्युंजय मंत्राने ला डॉक्टर शालिग्राम भंडारी यांनी सर्वप्रथम नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन केलं. एखादी व्यक्ती जन्मल्यानंतर तिच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कसा होतो हे त्यांनी रिकाम्या गलासच उदाहरण देऊन स्पष्ट केलं. अशा विकसित व्यक्तींकडून तिचं योगदान टाईम टॅलेंट-ट्रेझर यातून ती व्यक्ती देऊ शकते- हे लायन डॉक्टर शाळीग्राम भंडारींनी शेरोशायरी व काव्यपंक्तींचा आधार घेऊन केले. लायन राजेंद्र आणि लायन ललित यांनी सूत्रसंचालन केले. डॉक्टर भंडारींच्या स्वलिखित पुस्तकाची माहिती ला राधेश्याम भंडारीनी दिल्यामुळे पुस्तकातील विचारधन वेचण्यासाठी रसिक वाचकांची पुस्तक घेण्यासाठी झुंबड उडाली. तळेगाव क्लबचे ज्येष्ठ ला महेशभाई शहा या समारंभासाठी उपस्थित होते.




