लोणावळा येथील प्रसिद्ध योग प्रशिक्षक आणि ‘सूक्ष्म योगा फॉउंडेशनचे पंकज शर्मा द ग्लोरी ऑफ द नेशन अवॉर्ड ने सन्मानित

मावळ मराठा न्यूज -लोणावळा,लोणावळा येथील प्रसिद्ध योग प्रशिक्षक आणि ‘सूक्ष्म योगा फॉउंडेशन- द स्कूल ऑफ योगा अँड ऑकल्ट सायन्सेस’चे संस्थापक अध्यक्ष पंकज शर्मा यांना २६ जानेवारी २०२५ रोजी जयपूर येथे उत्थान फाउंडेशन, दिल्ली आणि मणिपाल हॉस्पिटल्स, जयपूर यांच्या वतीने द ग्लोरी ऑफ द नेशन अवॉर्ड २०२५ प्रदान करण्यात आला. योग क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाबद्दल त्यांना हा प्रतिष्ठित सन्मान मिळाला आहे.हा पुरस्कार त्यांच्या योगद्वारे समाजाच्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक विकासासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत प्रदान करण्यात आला. पंकज शर्मांनी आतापर्यंत १०,००० पेक्षा जास्त लोकांचे जीवन योगाच्या माध्यमातून सकारात्मकरित्या बदलले आहे.हा सन्मान केवळ त्यांच्या वैयक्तिक यशाचे प्रतीक नसून, संपूर्ण लोनावळा आणि महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद क्षण आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page