मावळ तालुक्यातील दिव्यांगासाठी आमदार निधीतुन मदत करावी-शिवभक्त अजित शिंदे यांची सुनील शेळके यांचेकडे मागणी




मावळ मराठा न्युज -मावळ – आज मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार -श्री.सुनिलअण्णा शेळके यांची ओवळे गावचे सा.कार्यकर्ते शिवभक्त अजित भाऊ शिंदे यांनी भेट घेतली.तसेच मला व मावळ तालुक्यातील इतर गरजु दिव्यांग बांधवाना आमदार निधीतुन मदत करावी.आमदार निधीतुन त्यांना विविध उपकरणे वाटप करावीत.त्यात व्हील चेअर, तीन चाकी सायकल व इतर विविध सहाय्यक उपकरणे,शासन निर्णयानुसार आमदार आमदार स्थानिक विकास कार्यक्रमातर्गत आमदार निधीतुन आमदार दिव्यांगांना मदत करण्यासाठी प्रतिवर्षी ३० लाख रूपये पर्यत निधी प्रस्तावित करू शकतात.तरी आपण आपल्या आमदार निधीतुन दिव्यांग बांधवाच्या कल्याणासाठी हा निधी खर्च करावा.व त्यांना मदत करावी.अशी मागणी अजित शिंदे यांनी आमदार-श्री सुनिल अण्णा शेळके यांना लेखी निवेदन अर्जाद्वारे केली आहे. तरी आमदार सुनील शेळके अजित शिंदे यांच्या मागणीचा विचार करतात की नाही मावळातील दिव्यांग यांना त्यांची मदत मिळते की नाही ते भविष्य काळात कळेल.




