लायन्स क्लब लोणावळा खंडाळा ने आणला बालग्राम येथील मुलाच्या चेहऱ्यावर आनंद

मावळ मराठा न्यूज़, लायन्स क्लब लोणावळा खंडाळा यांच्यावतीने नुकताच संपर्क बाल अशा घर नांदगाव देवघर तालुका मुळशी येथे पितृ पंधरवड्यानिमित्त बालग्राम मधील सर्व बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच संस्थेतील मुलांसाठी ला. नंदकिशोर खंडेलवाल (राजाजी) यांच्यावतीने किराणा साहित्य, डॉ. सुहास गोसावी मनशक्ती केंद्र लोणावळा तसेच लायन डॉ. पी एम ओसवाल यांनी मुलांची आरोग्य तपासणी केली. टोनी लँड शॉप चेंबूर यांच्यावतीने संपर्क बाल आशा घर येथील मुलांसाठी तसेच संपर्क ग्रामीण विद्या विकास केंद्र भांबर्डे येथील मुलींसाठी कपडे, त्याचप्रमाणे अनिल भिलारे यांच्या वतीने संस्थेतील मुलांसाठी ब्लॅंकेट इत्यादी साहित्य भेट देण्यात आले. या कार्यक्रमाला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, मावळ वार्ता फाउंडेशन चे अध्यक्ष श्री. नंदकुमार वाळंज (बाबूजी), माझी आदर्श सरपंच माननीय सौ वत्सलाताई वाळंज, लायन एड.प्रफुल लुंकड अध्यक्ष लायन्स क्लब लोणावळा खंडाळा, लायन देवेंद्र नालेकर माजी अध्यक्ष लायन्स क्लब लोणावळा खंडाळा, लायन विरल गाला ,सचिव लायन्स क्लब लोणावळा खंडाळा, लायन डॉ दिलीप सुराणा, लायन डॉ पोपट ओसवाल, लायन प्रकाश जैन, खजिनदार लायन्स क्लब लोणावळा खंडाळा, लायन्स क्लब लोणावळा खंडाळाचे सदस्य मंगेश कदम, तसेच या कार्यक्रमाला प्रकाश ढंभीरे,बी. एस. राजपूत,उत्तम रॉय, दिनेश बॅनर्जी, सविता शिंदे, स्वतंत्र कुमार ओसवाल,शशिकांतजी खंडेलवाल सदर कार्यक्रमासाठी लायन नंदकिशोरजी खंडेलवाल (राजाजी) यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले, तसेच सामाजिक कार्यकर्ते श्री, अमर लोखंडे यांनी मान्यवरांचे आभार मानले. संपर्क बाल आशा घर परिवार कर्मचारी वृंद यांच्या वतीने कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page