लोणावळ्यात सुर सम्राज्ञी आशा भोसले यांच्या गीतांवर आधारित “पिया तू”ला प्रेक्षकांची उत्स्फूर्त प्रतिसाद





मावळ मराठा न्युज :-लोणावळा,अँड प्रथमेश रजपूत प्रस्तुत व प्रदीप वाडेकर आयोजित आशा भोसले यांच्या गीतांवर आधारित कार्यक्रम” पिया तू “प्रेक्षकांच्या पसंतीला उतरला.लोणावळ्यातील निवडक कलाकार मंगला राणे , प्रियांका बच्छाव , रेश्मा गिध निशा नाइक यांनी आशा भोसले यांची निवडक दर्जेदार गीते सादर केली यात प्रशांत नाईक व प्रदीप वाडेकर यांनी सह गायकांची भूमिका बजावली तर ऐश्वर्या रजपूत हिने विशेष गीत सादर केले. अतिशय खुमासदार शैलीत अनुप्रिता यादव ह्यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले. प्रत्येक गाण्याला दाद देणारा प्रेक्षक वर्ग मोठ्या संखेने उपस्तिथ होता. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मुंबईच्या ज्येष्ठ समाजसेविका पद्मिनी शंकरशेठ , विलासराव शंकरशेठ , ज्येष्ठ समाजसेवक नंदकुमार वाळज, वत्सला वाळुंज, धीरूभाई कल्याणजी आवर्जून उपस्थित होते.तसेच आधार फाउंडेशन चे अध्यक्ष प्रकाश पाठारे , डॉ नामदेव डफळ, जेष्ठ नागरिक संघाचे खजिनदार गोरख चौधरी , संजय गोळपकर, राजेश मेहता , लायन्स क्लब लिजेन्ड चे अध्यक्ष सुरेश गायकवाड , लायन्स क्लब च्या माजी अध्यक्षा विजया खंडेलवाल , डॉ हिरालाल खंडेलवाल, शत्रुघ्न खंडेलवाल, जिभाऊ बच्छाव ,श्रीराम कुमठेकर, जे बी सींग बक्षी , सुनील यादव ,राजेंद्र दिवेकर,बापुलाल तारे , म्रुदुला पाटील, संध्या गव्हले , रश्मी सिरसकर , सुनील पानगावकर, किरण स्वामी, सविता परदेशी, सुनील म्हस्के, प्रतीक्षा महाडिक, प्रमोद बन्सल,आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.अँड प्रथमेश रजपूत यांच्या वतीने प्रमुख पाहुणे व कलाकारांचा भेटवस्तू देवून सन्मान करण्यात आला.




