मेहता म्युजिकल प्रस्तुत सुरोंकी महफिल हा सुमधुर,बहारदार गीतांचा कार्यक्रम संपन्न



लोणावळा -मंगळवार दि.११ मार्च २०२५, रोजी सायं ६ वाजता सुरोंकी महफिल हा सुमधुर गीतांचा कार्यक्रम महिला मंडळ सभागृह येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.जुन्या नव्या बहारदार गीतांचा लोणावळेकर नागरिकांनी आनंद लुटला.राजेश मेहता,राजेंद्र दिवेकर,रेश्मा गिध,सौ.प्रिया मेहता यांनी बहारदार गीते सादर करत रसिकांचा आनंद द्विगुणित केला.या कलाकारांना वादक चिंतन मोढा, सुश्मा गिध,सुनील बोके,अतुल पटेकर यांनी उत्तम साथ दिली. या बहारदार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.उमा मेहता यांनी केले.




