ट्रेकिंग करताना सावधान,ढाक भैरव ट्रेक करणाऱ्या सहा जणांना वाचविण्यात यश

मावळ मराठा न्यूज़ प्रतिनिधि , ढाक भैरव ट्रेक पावसाळ्यात करु नये , सलग चार ग्रुप या रस्त्यावर वाट भरकटले आहेत शोध बचाव मोहीम काल दिनांक ०१/१०/२०२३ सायंकाळी ६ .१५ ला कॉल आला एक ग्रुप ढाक भैरवला जाताना रस्ता चुकला आहे. श्रीपाद तगलपल्लेवार, क्षितीज गजभिये, अन्शुळ शेंडे, शुभम वाघ, कुणाल ठाकुर, आशिष ठाकरे सर्व मुळ नागपूर, गोंदिया व नोकरी पुणे असे चुकलेल्या मुलांची नावे आहेत १०० नंबर वर कॉल केल्यामुळे कर्जत, कामशेत पोलीस स्टेशनकडून सुध्दा कॉल आले. शिवदुर्ग रेस्कु टिमचे दहा सदस्य लगेचच तयारी करून निघाले आठ वाजता चालायला चालू केले. लोकेशन घेतलेले होते. एकाच ठिकाणी बसून रहा सांगितले होते. स्थानिक गावकरी व पोलीस पुढे शोधायला गेले होते. शिवदुर्ग टीम पण मागे मागे मदतीला गेली . त्यांनी ढाक गुहेकडचा रस्ता सोडून पुढे ढाक गावाचा रस्ता पकडला होता व गावाच्या जवळपास ते पोचले होते. शिवदुर्ग मित्र लोणावळा, स्थानिक ग्रामस्थ बाळासाहेब पवार पोलिस पाटील, पोलीस कर्मचारी निंबाळकर, सातपुते, ए.पी.आय नम साहेब ,कामशेत पोलिस स्टेशन यांनी त्यांना जंगलातून सुखरूप बाहेर आणले. त्यांना चालताही येत नव्हते.. संततधार पाऊस, दाट धुके , अंधार, शेवाळलेल्या पाय वाटा यासारख्या अनेक अडचणींवर मात करीत रेस्कु ऑपरेशन रात्री साडेबारा वाजता संपले. सहा जणांचे जीव वाचले, शिवदुर्गची आजची टीममधे सुनिल गायकवाड, महेश मसने, योगेश दळवी, कपिल दळवी, अमोल सुतार, ओंकार पडवळ, सागर कुंभार, योगेश उंबरे, आनंद गावडे, प्रणय अंबुरे.यांनी सहभाग घेतला .

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page