डिव्हाईन सोल्युशनस अकॅडमी आयोजित डिफाइन डे २०२५ कार्यक्रमांतर्गत पुरस्कार वितरण व पुस्तक प्रकाशन दिमाखात संपन्न

मावळ मराठा न्युज – चिंचवड,डिव्हाईन सोल्युशनस अकॅडमी आयोजित डिफाइन डे २०२५ कार्यक्रमांतर्गत पुरस्कार वितरण व पुस्तक प्रकाशन सोहळा रामकृष्ण मोरे सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखात पार पडला. यावेळी मा श्री विकास भोईर व मा सौ स्वाती गोरडे लिखित तुम्हीच तुमच्या मुलांचे भाग्यविधाते या पुस्तकाचे प्रकाशन चंदू चॅम्पियन मुव्हीचे रियल हिरो, पद्मश्री आणि अर्जुन पुरस्कार विजेते मा श्री मुरलीकांत जी पेटकर सर यांच्या हस्ते झाले. आमदार सौ उमाताई खापरे, मा सौ श्वेता प्रकाश ( Director of Ace Speculum), मा शोभा जवळगीकर (Counsellor, translator), मा डॉक्टर श्री प्रवीण बढे(Director of Pristine Ayur India) मा श्री हरीश निडवंचे(Director of Nadbrahm Idli), मा सौ आशाताई काळे (BJP Secretory), मा श्री भाऊ भोईर(Sarpanch) हे मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आपल्या व्यवसायात विशेष कामगिरी बजावणारे नामांकित व्यवसायिक मा श्री विनायक मानमोडे, मा श्री महेश बोडके, मा नयना बलकुंडी यांना डिव्हाईन उद्योग रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे मा श्री प्रमोद बडिगेर, मा सौ शितल बडिगेर, मा श्री संभाजी पिसाळ, मा सौ शुभांगी घुले,मा सौ प्रणोती पवार, मा श्री रविकिरण मंडलिक, मा श्री अमोल गव्हाळे, मा श्री श्रीकांत नीलकंठ, मा श्री शामराव जावळे, मा श्री राहुल दळवी यांना डिव्हाईन कार्य गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच तुम्हीच तुमच्या मुलांचे भाग्यविधाते या पुस्तकाचे प्रकाशक मा श्री निलेश महाजन यांना डिव्हाईन मित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ वैशाली गुरव व कु श्रेया गोडांबे यांनी केले. डिवाइनच्या विद्यार्थ्यांना डिवाइन गुणगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन डिव्हाईन सोल्युशन्स अकॅडमी व डिव्हाईन किड्स प्री स्कूलचे संचालक श्री विकास भोईर(लेखक, वक्ते, प्रशिक्षक), सौ स्वाती गोरडे (लेखिका, समुपदेशक, प्रशिक्षक), श्री दत्तात्रय कसाळे, सौ सुवर्णा गोडांबे यांनी केले. यावेळी डिव्हाईन सोल्युशनस अकॅडमी, डिव्हाइन किड्स टीचर स्टाफ, डिव्हाइन ग्रोथ पार्टनर्स यांचे सहाय्य लाभले. डिवाइन सोल्युशनस अकॅडमी व डिव्हाईड किड्स प्री स्कूलचे सर्व पालक व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page