वरसोली टोल नाक्याजवळील रस्त्याबाबत मनसेकडून निवेदन, प्रशासनकडून कारवाईचे आश्वासन


मावळ मराठा न्यूज़ लोणावला, वरसोली टोल नाक्याजवळ रस्ता खचला आहे या कारणास्तव दोन्ही बाजूच्या एक एक लेन बंद आहेत याबाबत आय आर बी टोल प्रशासन बरोबर मनसे चे संदीप पोटफोडे आणि सहकारी यानी आज चर्चा केली. नागरीकांच्या सुरक्षा व कोणताही अपघात होऊ नये म्हणून साईड पट्टा करून, रिफ्लेक्टर लावण्यात येतील व यात्रे दरम्यान पूर्ण वेळ पेट्रोलिंग वाहन उभे करू जेणे करून वाहतुकीस कोणताही अडथळा होणार नाही व वाहतूक कोंडी होणार नाही. तसेच लवकरात लवकर पुलाचे काम पूर्ण करून वाहतूक सुरळीत सुरू करू असे आश्वसन प्रशासनकडून देण्यात आल्याचे पोटफोडे यांनी मावळ मराठा न्यूज़ शी बोलताना सांगितले.




