सतत होणाऱ्या अपघातातील रुग्णांना उपचारासाठी ट्रॉमा केअर सेंटर सुरू करण्याची लोणावळा भाजपची मागणी


मावळ मराठा न्यूज,खंडाळा,राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव आणि उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांनी खंडाळा येथील विश्राम गृहात भेट घेवून कुसगाव येथील टोल नाक्याजवळ असलेल्या २५ हजार चौरस मीटर वाणिज्य वापरासाठी २० वर्षापूर्वी बांधलेली इमारत न वापरता तशीच पडून आहे.त्याठिकाणी द्रुतगती महामार्गावर होणाऱ्या अपघातातील जखमींना वेळेवर उपचार करता यावा त्यासाठी ट्रॉमा सेंटर सुरू करावा अशी मागणी केली त्याला मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सकारात्मक आश्वासन दिले,संबंधित विभागाशी लवकरच चर्चा करून याविषयी निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही दिली. यावेळी लोणावळा नगरपरिषद हद्दीतून जाणाऱ्या मुंबई पुणे हायवे बाबत वारंवार रुंदीकरण करण्याबाबत अतिक्रमणे उठवली जातात,परंतु वर्षोनुवर्षे रुंदीकरण केले जात नाही त्यामुळे पुन्हा त्याजागी अतिक्रमण होत असते त्यासाठी येथील व्यावसायिक स्वतःहून अतिक्रमण हटवून रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी तयार असल्याचे श्रीधर पुजारी यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना यावेळी सांगितले.लोणावळ्यात लाखोच्या संख्येने पर्यटक येत असतात.त्यासाठी मुंबई पुणे हायवे रस्ता रुंदीकरण गरजेचे आहे तसेच द्रुतगती महामार्गावरील अपघात झाल्यास जवळ असे उपचारासाठी कुसगाव टोल नाक्याजवळ असलेल्या आणि २० वर्षे कोणताही वापर न करता २५ हजार चौरस मीटरचा वाणिज्य वापरासाठी बांधलेल्या भव्य इमारतीचे ट्रॉमा सेंटर मध्ये रुपांतरीत करून त्याचा वापर सुरू करावा अशी मागणी सुरेखा जाधव,श्रीधर पुजारी,रामविलास खंडेलवाल,सुनील तावरे यांनी केली, यावेळी जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोरभाऊ आवारे, सुशील सैदाणे,नंदू जोशी,पत्रकार,आदी मान्यवर उपस्थित होते.




