पवनानगर रोड कडधे गावाजवळ अपघात, वन्यजीव रक्षक,मावळ संस्था तसेच आपदा मित्रच्या मदतीने ड्राइवर सुखरूप बाहेर






मावळ मराठा मावळ -पवनानगर रोड, कडधे गावा जवळ अपघात झाला,रात्रीच्या अंधारात गाडी निलगिरीच्या झाडावर धडकली व अपघात झाला. ड्रायव्हरचा पाय त्यात अडकला व पाय मोडला,वन्यजीव रक्षक मावळ संस्था तसेचआपदा मित्र व ग्रामस्थ यांच्या प्रयत्नातून ड्रायव्हर ला सुखरुप बाहेर काढून पुढील उपचारासाठी पवना हॉस्पिटलला राणी ऍम्ब्युलन्स ने पाठवले आहे.त्याचा उपचार सुरु आहे.




