सामाजिक कार्यकर्त्या अनिताताई पांचाळ,आकाश पांचाळ यांच्यावर केलेल्या अमानुष मारहाणीचा सर्वत्र निषेध


मावळ मराठा न्यूज़ :- पिंपरी प्रतिनिधी, पिंपरी चिंचवड शहरांमध्ये प्रामुख्याने रहाटणी काळेवाडी परिसरामध्ये सर्वसामान्य जनतेला वेळोवेळी कागदपत्र शासकीय कागदपत्र व इतर कागदपत्र मिळवण्या कामी मदत करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अनिताताई पांचाळ व आकाश पांचाळ यांना पिंपरी साई चौक या ठिकाणी माजी नगरसेवकाच्या समर्थकांनी लाथा व बुक्क्यांनी मारहाण केली या निंदनीय घटनेचा शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या वतीने तीव्र शब्दांमध्ये निषेध व्यक्त करीत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे माजी नगरसेवक यांच्या समर्थकांनी जी मारहाण केलेली आहे हे अतिशय चिंताजनक बाब आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने सहकार्य करावे व संबंधित मारहाण करणाऱ्या गुंडांवरती तात्काळ कडक कारवाई करण्यात यावी अशी आम्ही शिवशाही व्यापारी संघ व सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्याच्या वतीने दाखले यांनी मागणी केली आहे.




