*भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनी देविदास कडू यांच्या शुभहस्ते लोणावळा नगरपरिषद माध्यमिक विद्यालयाच्या ध्वजारोहण*






मावळ मराठा न्युज -भारताच्या स्वातंत्र्य दिनी लोणावळा नगरपरिषद माध्यमिक विद्यालयाच्या २५ गरजू विद्यार्थ्यांना ट्रस्ट ग्रुपच्या वतीने देण्यात आलेल्या मोफत सायकलींचे लोणावळा नगरपरिषदेचे अधिकारी श्री.पंकज सरोदे व श्री. आनंद मोरे यांच्या शुभहस्ते फित कापून वितरण करण्यात आले. तसेच नारायणी धामच्या वतीने मोफत स्कूलबॅगचे वितरण करण्यात आले.कॅनरा बँकेच्यावतीने गुणवंत विद्यार्थिनींना प्रत्येकी पाच हजार रुपये विद्याज्योती शिष्यवृत्ती बँक प्रॉजेक्ट मॅनेजर श्री. अभिषेक जैन यांच्या शुभहस्ते कु. गौरी जगताप, कु. संध्या वाठोरे, व कु. संजीवनी गायकवाड यांना देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री. बलकवडे सर यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. पारिठे सर यांनी केले. तर आभारप्रदर्शन श्री. पठाण सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्रद्धा मंगवडे, साक्षी नलावडे व श्रीमती सुषमा जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमात विद्यालयाचे पालक सभासद व उत्कृष्ट गायक श्री. गणेश देसाई यांच्या देशभक्ती गीतांनी वातावरण प्रफुल्लित केले.



