लोणावळ्यात कैवल्य धाम योग संस्थेच्या शताब्दी वर्ष सोहळा चे उद्घाटन राष्ट्रपति द्रोपदी मुर्मू यांचे हस्ते संपन्न



मावळ मराठा न्यूज़:- लोणावला जगप्रसिद्ध कैवल्यधाम योग संस्था लोनावला च्या शताब्दी वर्षानिमित्त भारताच्या राष्ट्रपति द्रोपदी मुर्मू यांचे प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांचे हस्ते योगावरील तीन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.यावेळी राष्ट्रपति मुर्मू म्हणाल्या, योगाच्या मार्ग अमूल्य ज्ञानाचा आपल्या मुलांना व्यक्ति आणि आपल्या तरुण पिढीला लोक फायदा व्हायला हवा या उद्देशाने शैक्षणिक धोरण २०२० मध्ये भारतीय ज्ञान परंपरेत असलेल्या योग ज्ञानाला शिक्षण व्यवस्थेत महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. प्राचीन भारतातील गुरुकुलमध्ये शिकणारे विद्यार्थी, बौद्धिक ज्ञान तसेच आध्यात्मिक ज्ञानाच्या मार्गावर मार्गक्रमण करत असत. आपल्या विद्यार्थ्यांना भारताच्या प्राचीन परंपरेच्या उपयुक्त घटकांशी जोडणे हा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा एक महत्त्वाचा पैलू आहे.आपल्या परंपरेत कैवल्य म्हणजेच मोक्ष हा सर्वोत्तम प्रयत्न मानला जातो. अर्थ, काम आणि धर्म या पायऱ्या पार करून माणसाला कैवल्य प्राप्त करायचे असते. व्यावहारिक ज्ञान आणि आध्यात्मिक ज्ञान एकमेकांना पूरक असल्याचे इश उपनिषदात स्पष्ट केले आहे. यावेळी दीपप्रज्वलन आणि शांति पाठाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली,शंभर वर्षाची कैवल्यधामची वाटचाल दाखवणारा लघुपट दाखवण्यात आला संस्थेचे अध्यक्ष ओपी तिवारी यांनी राष्ट्रपति मुर्मु यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. सचिव सुबोध तिवारी यानी शाब्दिक स्वागत करत प्रास्ताविक केले तर माजी क्रेन्द्रिय मंत्री आणि शताब्दी वर्ष समिति अध्यक्ष सुरेश प्रभु यानी स्वातंत्र्याला ७५ वर्षे झाली असली तरी लोणावळ्यात देशाच्या राष्ट्रपति येण्याची पहिलीच वेळ असल्याचे नमूद केले.




