लोणावळ्यातील कैवल्यधाम संस्था म्हणजे साक्षात स्वर्ग- आचार्य लोकेश मुनीजी यांचेकडून संस्थेने केलेल्या १०० वर्षाचा कार्याचा गौरव








मावळ मराठा न्युज – लोणावळा,प्रसिद्ध जैन विद्वान आणि आध्यात्मिक गुरु परमपूज्य आचार्य डॉ. लोकेश मुनि जी यांचे दिनांक २० मार्च २०२६ रोजी कैवल्यधाम, लोणावळा येथे व्याख्यान संपन्न झाले.आचार्य डॉ. लोकेश मुनि जी शांती शिक्षणातील त्यांचे योगदान,प्राचीन काळातील ध्यान आणि योग परंपरांना आधुनिक वैज्ञानिक संशोधनाशी जोडते. त्यांच्या शिकवणी मानवी चेतनेत परिवर्तन घडवून आणणे, मानवी वर्तनातील प्राण्यांच्या प्रवृत्ती कमी करणे आणि सखोल मानवी आणि आध्यात्मिक मूल्ये जागृत करणे हे आहे.लोणावळ्यातील जागतिक ख्याती असलेल्या कैवल्यधाम योग संस्थेमध्ये “स्वामी कुवलयानंद व्याख्यानमाला” अंतर्गत प्रसिध्द जैन विद्वान आणि आध्यात्मिक गुरु परमपूज्य आचार्य डॉ. लोकेश मुनि जी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.कार्यक्रमाची सुरुवात शांती पाठाने करण्यात आली. गोवर्धनदास सक्सेरिया योग महाविद्यालयातील विद्यार्थिनी कुमारी शनाया वात्सायन यांनी परमपूज्य आचार्य लोकेश मुनि जी यांचा संक्षिप्त स्वरूपात परिचय करून दिला.कैवल्यधाम संस्थेचे मानद सचिव व प्रमुख कार्यकारी अधिकारी श्री सुबोध तिवारी यांनी परमपूज्य आचार्य डॉ. लोकेश मुनि जी यांना शाल, कैवल्यधाम संस्थेचे कॉफी टेबल बुक तसेच संस्थेचे मानचिन्ह देऊन सन्मानित केले.यानंतर प्रसिद्ध जैन विद्वान आणि आध्यात्मिक गुरु परमपूज्य आचार्य डॉ. लोकेश मुनि जी यांनी आपल्या व्याख्यानातून उपस्थितांची मने जिंकली. कैवल्यधाम संस्थेने १०० वर्षे पूर्ण केली असून इथे आल्यावर मनाला शांतता मिळते याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे गौरवद्गार त्यांनी या प्रसंगी काढले. आणि आंतरराष्ट्रीय ख्याती असलेल्या कैवल्यधाम संस्थेस त्यांनी स्वर्गाची उपमा दिली. व्याख्यानानंतर आचार्य लोकेश मुनी जी यांनी श्रोत्यांच्या प्रश्नांना आपल्या भाषाशैलीतून उत्तरे देऊन त्यांचे निरसन केले.याप्रसंगी कैवल्यधाम संस्थेचा अधिकारी व कर्मचारी वर्ग, योग महाविद्यालयातील विद्यार्थी, पत्रकार तसेच लोणावळ्यातील मान्यवर व्यक्ती उपस्थित होत्याकार्यक्रमाची सांगता” ओम पूर्ण मद…” मंत्राने झाली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन कुमारी शनया वात्सायन यांनी केले.या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे मानद सचिव व प्रमुख कार्यकारी अधिकारी श्री सुबोध तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.



