एक पेड माँ के नाम,अमृत आणि DAY NULM लोणावळा नगरपरिषद यांचे विद्यमाने कृती संगम अंतर्गत बचत गटाकडून वृक्षरोपण

मावळ मराठा न्युज- lखंडाळा,अमृत आणि DAY NULM लोणावळा नगरपरिषद यांचे विद्यमाने कृती संगम अंतर्गत बचत गटांच्या महिलांनी झाडे लावणे आणि झाडे संगोपन करण्याच्या कार्यक्रमात पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली. खंडाळा तलावाच्या बाजूने झाडे लावण्याच्या बाबतीत हिरकणी बचत गटांच्या महिलांकडून झाडे लावण्या बाबत सर्वेक्षण करण्यात आले.यावेळी कर निर्धारण अधिकारी विद्या कारचे, शहर अभियान व्यवस्थापक दिलीप गायकवाड,उपजीविका केंद्राच्या संगीता पवार,सीमा पवार,संगीता विरभद्रे,पूजा राठोड तसेच हिरकणी बचत गटाच्या अध्यक्ष अश्विनी काकडे तसेच अन्य ८ महिला उपस्थित होत्या . यावेळी शहर अभियान व्यवस्थापक दिलीप गायकवाड यांनी अमृत कृती संगम अभियानाची माहिती दिली.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page