पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत लोणावळा महाविद्यालयाला विजेतेपद


मावळ मराठा न्यूज़ :-लोणावळा:सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व पुणे जिल्हा विभागीय क्रिडा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरमहाविद्यालयीन पॉवरलिफ्टिंग मुले-मुली स्पर्धा इंद्रायणी महाविद्यालय,तळेगांव दाभाडे येथे संपन्न झाल्या. सदर ठिकाणी सुमारे २५ महाविद्यालयाच्या स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.यामध्ये आपल्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले व गटात विजेतेपद मिळविले.प्रतीक दिनकर वावळे-५९ कि.ग्रॅ. – प्रथमसाहिल संतोष पवार-५९ कि.ग्रॅ. – द्वितीयवरद बाळू घारे – ६६ कि.ग्रॅ. – द्वितीयपालवे करण सुरेश – ७४ कि.ग्रॅ. -द्वितीयकुंजन किरण दळवी – १०५ कि.ग्रॅ.-तृतीयसदर विद्यार्थ्यांपैकी प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या खेळाडूंची निवड श्रीरामपूर येथील आंतरविभागीय स्पर्धेसाठी झालेली आहे.सदर खेळाडूंना श्री.तेजस भांगरे,श्री.आकाश गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभत असून क्रीडा-प्रशिक्षक प्रा.दीपक तारे यांचे विशेष सहकार्य लाभले.सदर खेळाडूंवर महाविद्यालयाचे विश्वस्त,प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.




