बापूसाहेब भेगडे हेच मावळातील तरुणाईचा आवाज संपूर्ण मावळात पिपाणी’चीच चर्चा मावळ मराठा न्युज -वडगाव

मावळ,मावळ विधानसभा मतदारसंघाचे सर्वापक्षीय अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांच्या प्रचारदौऱ्यात उच्चशिक्षित तरुणांनी पाठिंबा देत बापूसाहेब भेगडेच तरुणाईचा आवाज असल्याचे सांगितले. सांगवी, जांभूळ, ब्राह्मणवाडी, मोहितेवाडी, साते, कान्हे, अहिरवडे, नायगाव, येवलेवाडी, चिखलसे, कुसगाव खुर्द, खामशेट, पाथरगाव, खडकाळे कामशेत, वडगाव शहर या सर्व गावांत बहुसंख्येने उपस्थित राहत महिलांनी औक्षण केले. फुलांच्या पायघड्या, फटाक्यांची आतिषबाजी करीत स्वागत केले. यावेळी माजी सभापती बाबुराव वायकर, मनसेचे तालुकाध्यक्ष रुपेश म्हाळसकर, अनंत कुडे, बडोपंत भेगडे, श्याम ढोरे, ग्रामस्थ, आजी-माजी सरपंच, महिला आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाबुराव वायकर म्हणाले, अनेक गावांमध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विकासकामे केली आहे. मात्र, काहीजण या कामांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहे. जलजीवन मिशनची टाकी दुसऱ्याच दिवशी कशी काय पडू शकते ? वारकरी संप्रदायचा वसा चालवणारे, शाश्वत विकास करू शकणारे, उच्च शिक्षित, स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व्हिजन असणारे, शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून काम करणारे बापूसाहेब भेगडे हेच मतदारांची पसंती आहेत. बापूसाहेब भेगडे म्हणाले, की शिक्षण, महिला सुरक्षितता, तरुणांच्या हाताला काम आदी गोष्टींमुळे मावळ समृद्ध, सुसंस्कृत होण्यास मदत होणार आहे. घराचं घरपण आणि गावाचं गावपण टिकलं पाहिजे. पण आज एकाधिकारशाहीमुळे आज नेमक्या याच गोष्टींकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे.




