पायी वारकरीना शिवसेना परिवार खंडाळा व सह्याद्री मानव सेवा मंच यांच्या वतीने फलहार,नाष्टा,जेवण, आरोग्य तपासणी आणि औषध वाटप



मावळ मराठा न्यूज़:- खंडाला सालाबाद प्रमाणे यंदाही श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा आळंदी येथे ठाणे ,पालघर ,भिवंडी, रायगड, नवी मुंबई, मुंबई येथून पायी वारकरी बंधू भगिनी मातांचे खंडाळा येथे स्वागत करून फलहार वाटप,नाष्टा,जेवण तसेच सर्वांचे आरोग्य तपासणी औषध वाटप खंडाळा येथील हनुमान मंदिर येथे शिवसेना परिवार खंडाळा व सह्याद्री मानव सेवा मंच ठाणे यांच्या वतीने करण्यात आले. याप्रसंगी सह्याद्री मानव सेवा मंचावतीने डॉक्टर ए डी जोशी, डॉक्टर अनिल रत्नाकर, डॉक्टर शेठ, डॉक्टर कोटक ,डॉक्टर गोविंद, सिस्टर करमरकर, निमकर मुळे, माटे तसेच रंगनाथ वरे, सतीश वैद्य, मंगेश जोशी, दत्तात्रेय भोईर, खंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर गमे, सिस्टर श्रीमती विजया चौधरी, सिस्टर कौरव नितीन काळे या सर्व स्वागत कक्षाचे प्रामुख्याने नियोजन करण्यात आले. शिवसेना माजी जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे , सचिन वाळके, भावेश खराडे, विशाल पात्रे, पंकज पवार, बाबू पवार यांच्यासह अनेक शिवसैनिक ग्रामस्थ उपस्थित होते.




