गुन्हेगारांचे कर्दनकाळ,आयपीएस सत्यसाई कार्तिक यांनी स्वातंत्र्यदिनी रक्तदान करून जपली सामाजिक बांधिलकी



मावळ मराठा न्युज :-लोणावळा,आय पी एस सत्यसाई कार्तिक यांनी आपले लक्ष नशा मुक्ती,अमली पदार्थ तस्करी,बेकायदेशीर दारू विक्री करणारे यांचेवर केंद्रित केले आहे. जेणेकरून तरुण तरुण आपल्या शालेय व् महाविद्यालयीन जीवनात नशेच्या आहारी जाऊ नये नवीन पिढी ही चांगली घडावी हा त्यांचा त्यामागील उद्देश. नुकताच म्हणजे १५ ऑगस्ट स्वतंत्र दिनाचे औचित्य साधून कान्हे फाटा मावळ येथे रक्तदान व आरोग्य शिबिर संपन्न झाले या शिबिरास सिंघम डॅशिंग लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक आयपीएस श्री सत्यसाई कार्तिक यांनी विशेष उपस्थिती लावून स्वतः व रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.रुद्राक्ष क्लिनिक व सौ प्रमोदिनी आनंद टपाले यांच्या सहकार्यातून आज कान्हे फाटा येथील इको वैली सोसायटी मधे रक्त दान शिबिर व आरोग्य चाचण्या घेण्यात आल्या. ७५ लोकांनी रक्तदान तर २०० हून अधिक लोकांनी आरोग्य चाचण्या केल्या. प्रत्येक सहभागी रक्तदात्यास भेटवस्तू देण्यात आल्या.चाकण ब्लड बँक व डॉ. ऐश्वर्या काळे यांनी परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमासाठी आयपीएस अधिकारी श्री सत्य साई कार्तिक यांनी विशेष भेट देऊन स्वतः रक्तदान देखील केले.या वेळी सोसायटी मधील नागरिक, कान्हे गावातील आजी माजी पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते.सकाळी १० वाजता चालू झालेला कार्यक्रम सायकाळी ५:०० वाजता संपला.कार्यक्रमाच्या शेवटी सौ प्रमोदिनी आनंद टपाले व डॉ. ऐश्वर्या ताई काळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.




