भोसरी एम. आय. डी. सी.मधील ई.एल ब्लॉग/प्लाट नंबर ३९/८ मध्ये बी.बी मोरे यांनी रस्त्यावर केलेल्या अतिक्रमणवर तात्काळ कारवाई करा.- युवराज दाखले




मावळ मराठा न्युज -पिंपरी:- प्रतिनिधी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत भोसरी एम आय डी सी मध्ये प्लांट नंबर ३९/८ मध्ये रस्त्यावर मोठ्या प्रमाणात बी बी मोरे यांनी वाहतूकदारांना अडचण करण्यासाठी अतिक्रमण केले.या अतिक्रमणामध्ये पत्राशेड मारून रूमा बेकायदेशीरपणे भाडे घेत आहे ही अत्यंत गंभीर बाब आहे या अतिक्रमणामुळे सर्व सामान्य नागरिक,मताभगिनी यांना त्रास होत आहे तसेच एकादी गंभीर आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर फार मोठी अडचण व जिवीत हानी होईल तरी आपण तात्काळ कारवाई करावी अशी मागणी शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष लोकसेवक युवराज दाखले यांनी केली.




