लायन्स क्लब तळेगाव आयोजित शालेय साहित्य वितरण आणि विद्यार्थी मार्गदर्शन शिबीर संपन्न




मावळ मराठा :-तळेगाव, प्रमुख वक्ते ला. डॉक्टर शालिग्राम भंडारी अध्यक्ष लायन डॉक्टर अनिकेत काळोखे प्रमुख पाहुण्या नगरपरिषद उपमुख्य अधिकारी- सौ ममता राठोड प्रकल्प अधिकारी ला दीपक बाळसराफ ज्येष्ठ ला भरत पोतदार लायन सुनील वाळुंज लायन प्रियंका काळोखे खजिनदार लायन प्रकाश पटेल व दोन्ही विद्यालयाचे मुख्याध्यापक- सौ वर्षा थोरात- श्री सुधीर बसवंतेसर व उपस्थित विद्यार्थ्यांच्या साक्षीनं दीप प्रज्वलनाने समारंभाची सुरुवात झाली! लायन अध्यक्ष डॉक्टर अनिकेत काळोखे यांनी सर्वांचे मनःपूर्वक स्वागत करून दहावीच्या परीक्षेत यश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी वेळेचे नियोजन कसे करावे? करिअर कुठलं निवडाव? हे मुद्दे विशद करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्यात. प्रोजेक्ट चेअरमन लायन दीपक बाळसराफ यांनी प्रमुख वक्ते लायन डॉक्टर भंडारी यांचा परिचय करून दिल्यानंतर लायन्स क्लबच्या या राबवल्या जाणाऱ्या व्याख्यानमाले मागील प्रमुख उद्देश आपल्या मनोगतात व्यक्त केला. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासंदर्भात विद्यार्थ्यांना संबोधित करताना डॉ.शालिग्राम भंडारी यांनी अनेक दृष्टांत कथा, काव्यपंक्ती आणि शेरोशायरीतून हा विषय विद्यार्थ्यांना समजेल, रुचेल, पचेल अशा पद्धतीने सादर केला. शरीराची काळजी घ्यायची म्हणजे आहार विहार यावर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. मानसिक आरोग्यासाठी गुणसंपन्न मित्र जोडणे,ग्रंथाचे वाचन करणे,नेहमी सकारात्मक विचारातून कृतिशील असणे हे जेवढे आवश्यक आहे तेवढेच व्यासपीठावर व्यक्त होणे हे ही व्यक्तिमत्व विकासासाठी तितकेच आवश्यक आहे. त्यासाठी दीर्घ प्राणायामच्या आधाराने उत्कृष्ट वक्तेही आपण होऊ शकतो असा आत्मविश्वास आपल्या व्याख्यानातून डॉक्टरांनी विद्यार्थ्यांना दिला. प्रमुख पाहुणे उपजिल्हाधिकारी पुनम अहिरे, श्री महेश हरीशचंद्रे- उपमुख्य अधिकारी सौ ममता राठोड यांनीही आपले अनुभव कथन करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.समारोपाच्या भाषणात मुख्याध्यापिका सौ वर्षा थोरात यांनी संपूर्ण कार्यक्रमाचा अत्यंत अभ्यासपूर्ण परामर्श घेतला. तसेच संत ज्ञानेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सुधीर बसवंते यांनी तळेगाव लायन्स क्लबच्या या व्याख्यानमालेचे मनःपूर्वक आभार मानलेत.




