*साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.आण्णा भाऊ साठे अर्धाकृती पुतळ्याचे पिंपरी चिंचवड शहर, देहुरोड, तळेगाव,वडगाव,कामशेत,लोणावळा शहरात मोठ्या जल्लोषात स्वागत*

मावळ मराठा न्युज-पुणे-प्रतिनिधी, मावळ तालुक्यात लोणावळा नगरपरिषद या ठिकाणी सा.लो.डॉ आण्णा भाऊ साठे यांचे अर्धाकृती पुतळा १ ऑगस्ट २०२५ रोजी बसविण्यात येणार आहे.या अर्धाकृती पुतळ्याचे स्वागत पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या उत्साहात करण्यात आले, निगडी येथील सा.लो. डॉ आण्णा भाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर जेष्ठ नेते संदिपान झोंबाडे व शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी शिवशाही व्यापारी संघ मावळ लोकसभा अध्यक्ष तथा सा.लो. डॉ आण्णा भाऊ साठे जयंती महोत्सव समिती कृष्णा दादा साबळे यांचा उद्योजक मनोज तोरडमल यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार केला.यावेळी बहुजन विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष संजय दादा धुतडमल,जेष्ठ नेते संदिपान झोंबाडे,उद्योजक मनोज तोरडमल, शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले , सा.लो. डॉ आण्णा भाऊ साठे जयंती महोत्सव समिती अध्यक्ष बाबासाहेब रसाळ, मा अध्यक्ष नानासाहेब कसबे, मार्गदर्शक डी पी खंडाळे, रामदास कांबळे,संजय ससाणे, अरूण जोगदंड, नितीन घोलप, वरिष्ठ उपाध्यक्ष शिवाजी साळवे, शिवशाही व्यापारी संघ पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष शिवाजीराव खडसे, प्रदेश सचिव सुरज आण्णा कांबळे,युवक अध्यक्ष ऋषिकेश वाघमारे, अनिकेत साळवे, राहुल सावंत, गणेश वाघमारे, जेष्ठ नेते नानासाहेब रोखडे, एकनाथ घोरपडे,जय देसाई,आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page