लोणावळा महाविद्यालयात ५३ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन व विविध बौद्धिक स्पर्धा संपन्न

मावळ मराठा न्युज – लोणावळा,पुणे जिल्हा परिषद,मावळ पंचायत समिती शिक्षण विभाग , मावळा तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ, मावळ तालुका विज्ञान अध्यापक संघ व लोणावळा एज्युकेशन ट्रस्ट चे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय आणि डॉ. बी. एन. पुरंदरे कला, श्रीमती. एस. जी. गुप्ता वाणिज्य व श्रीमती. शारदाबेन अमृतलाल मिठाईवाला विज्ञान महाविद्यालय, लोणावळा यांच्या संयुक्त विद्यमाने लोणावळा (वलवण) महाविद्यालयात ५३ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन व विज्ञान प्रकल्प स्पर्धा तसेच शालेय निबंध स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा आणि वत्कृत्व स्पर्धा दि. २९ व ३० डिसेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाचे उदघाटन जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अशोक नगरकर यांच्याहस्ते झाले. उदघाटन प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र देशमुख यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे सचिव श्री. नंदकुमार सागर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. उदघाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोणावळा एज्युकेशन ट्रस्ट चे उपाध्यक्ष मा. श्री. दत्तात्रय पाळेकर हे होते. उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे डॉ. अशोक नगरकर यांनी बोलताना विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोण विकसित होणे काळाची गरज असून विज्ञान प्रदर्शनातून विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला आणि संशोधन वृत्तीला चलन मिळते असे प्रतिपादन केले. आजचे विद्यार्थी उद्याचे शास्त्रज्ञ असून त्यांनी प्रश्न विचारण्याची सवय आणि त्यावर उपाय शोधण्याची वृत्ती जोपासली पाहिजे तसेच पेटंट प्राप्त करण्यासंबंधातील माहिती देवून त्याचे महत्व प्रतिपादित केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. दत्तात्रय पाळेकर यांनी संस्थेच्या विकासात्मक प्रवासाचा आढावा घेतला. या कार्यक्रमासाठी लोणावळा एजुकेशन ट्रस्ट चे विश्वस्त मा. श्री. सुनील ठोंबरे, श्री. विशाल पाडाळे, विस्तार अधिकारी श्री. सुदाम वाळंज, नंदकूमार सागर, कुंडलीक मेमाणे, विठ्ठल माळशिकारे, विकास तारे, सुरेश दातार आदि मान्यवर तसेच विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक आणि सहभागी व प्रदर्शन पाहण्यास आलेले विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संजय साळुंखे आणि ज्योति लावरे यांनी केले तर डॉ. अमर काटकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. या विज्ञान प्रदर्शनात मावळ तालुक्यातील सुमारे ५४ शाळामधून प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक गटात विद्यार्थ्यांनी विविध १०६ प्रकल्प सादर केले तसेच शिक्षक आणि प्रयोगशाळा परिचर यांनीही प्रकल्प सादर केले. विज्ञान, गणित, पर्यावरण, तंत्रज्ञान, आरोग्य व सामाजिक उपयुक्तता या विषयावरील प्रकल्प उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते.विज्ञान प्रदर्शनासोबतच शालेय निबंध स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा आणि वत्कृत्व स्पर्धा देखील आयोजित करण्यात आल्या होत्या. सर्व स्पर्धा आणि प्रकल्प यांचे परीक्षण तज्ञ परीक्षकांकडून करवून उत्कृष्ट प्रकल्पांची निवड जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी करण्यात आली. स्पर्धेचा समारोप व बक्षीस वितरण समारंभ पुणे जिल्हा परिषदेचे शिक्षणंधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व लोणावळा एज्युकेशन ट्रस्ट चे खजिनदार, प्रसिद्ध वास्तुविशारद तसेच लोणावळा नगरपरिषदेचे नगरसेवक मा. दत्तात्रय येवले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. प्राचार्य डॉ. नरेंद्र देशमुख यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. मावळ तालुका विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष श्री सुरेश सुतार सर यांनी दोन दिवसीय कार्यक्रमाचा आढावा घेतला व एकूण २७८ विद्यार्थ्यांनी स्पर्धांमध्ये सहभाग घेतल्याचे नमूद केले. डॉ. भाऊसाहेब कारेकर यांनी आपल्या भाषणात मावळ तालुक्याने शैक्षणिक गुणवत्तेच्या बाबतीत चांगली ऊंची गाठली असून अजून अशीच प्रगती राहावी अशी अपेक्षा व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या प्रकल्पनचे कौतुक करतानाच विद्यार्थ्यांना पेटंट आणि उपयोगी संशोधनाचे महत्व देखील पटवून दिले. आपल्या अध्यक्षीय भाषणात मा. दत्तात्रय येवले यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले तसेच सर्वकाही करत असताना आरोग्याचे महत्व सांगून आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका असा मोलाचा सल्ला दिला. यावेळी कार्यक्रमाचे आयोजक, विविध परीक्षक तसेच मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. विजेत्या स्पर्धकांना परितोषिकांचे वितरण करण्यात आले. तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले..

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page